..................
दरराेज पाणीपुरवठा करण्याची मागणी
भर जहागीर : प्रकल्पात पुरेशा प्रमाणात जलसाठा असूनही भर जहागीर येथे ग्रामपंचायतीतर्फे दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. भर जहागीर येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठ्याची सोय झाली आहे. त्यामुळे दरराेज पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
..................
प्रवाशांचा विनामास्क सर्रास प्रवास
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटापासून नागरिकांचा बचाव करण्याच्या हेतूने राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसवर दोन्हीकडून ‘नो मास्क - नो प्रवास’ असे फलक लावण्यात आलेले आहेत; मात्र याकडे दुर्लक्ष हाेत असून प्रवासी सर्रास विनामास्क प्रवास करताना दिसून येत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
...........
वेशींची दुरुस्ती करण्याची मागणी
कारंजा : कारंजात असलेल्या पुरातन वेशींच्या रखडलेल्या कामाची पुरातत्त्व विभागाकडून पाहणी करण्यात आली. या वेशींच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला हाेता. दाेन वेशी वगळता इतर वेशींची कामे प्रलंबित असून ती कामे करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांतून हाेत आहे.