शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

खासगी बसला अपघात; १८ प्रवासी जखमी

By admin | Updated: March 11, 2017 02:33 IST

मालेगाववरून रिसोडकडे जाणार्‍या खासगी बसला अपघात; गंभीर जखमींना उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले.

शिरपूर जैन (वाशिम), दि. १0- मालेगाववरून रिसोडकडे जाणार्‍या खासगी बसला अपघात होऊन १७ ते १८ प्रवासी जखमी झाल्याची घटना वसारी गावाजवळ शुक्रवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास घडली. स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. जखमींना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. एचएच ३७- ६८४४ ही खासगी बस १0 मार्च रोजी सकाळी ९ वाजता मालेगाववरुन रिसोडकडे प्रवासी घेऊन जात होती. वसारी गावाजवळ स्टेरींग रॉड तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. रस्त्यालगचे झाड तोडून बस उलटी होऊन परत सरळ झाली. या अपघातात एकूण १७ ते १८ जण जखमी झाले. यापैकी गंभीर जखमींना वाशिम व अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. जखमींना प्रथमोपचारासाठी शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता, वैद्यकीय अधिकारी ङ्म्रीकांत करवते हे आरोग्य केंद्रात उपस्थित नसल्याचे दिसून आले. परिचारीका अर्चना माळेकर महानंदा बोपटे, एम.आर.जाटे, गाडे, कर्मचारी मुन्ना लांडगे, अमर झळके आदी आरोग्य कर्मचार्‍यांनी तातडीने उपचार सुरू केले. पाच रुग्णवाहिकेने जखमींना उपचारासाठी वाशिमला पाठविले. जखमींमध्ये अरुण नवृत्ती मुराडकर रा. पेडगाव, गोपाल वामन पंडितकर रा.शेगाव खोडके, पुष्पा वामन पंडितकर रा.शेगाव खोडके, बबन पुरी व दादाराव सरवाणी रा. बोरगाव, शत्रुघ्न किसन शिंदे, लक्ष्मी संतोष गवई, संतोष गवई, अश्‍विनी गावंडे, शहीस्ता परवी, महेमद मुज्जंबीर गुलाम नबी, उमेश उद्धव जाधव रा. वसारी यांच्यासह पाच ते सहा जणांचा समावेश आहे.