शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणी पुनरिक्षणांतर्गत मुख्याध्यापक, प्राचार्यांची कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 18:21 IST

वाशिम: मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोंबर २०१८ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, मयत व दुबार मतदारांची नावे वगळण्याची मोहीम सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोंबर २०१८ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, मयत व दुबार मतदारांची नावे वगळण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या कार्यशाळेचे आयोजन नियोजन भवन येथे १६ आॅक्टोबरला करण्यात आले. यावेळी सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक विद्याथ्यार्चे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट होणे आवश्यक असून याकरिता संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी मतदार साक्षरता क्लबच्या माध्यमातून या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश्वर हांडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, उत्तम फड, महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नवीन मतदार नोंदणी, महाराष्ट्र हरित सेना नोंदणी यासह पोक्सो कायदा व बालविवाह प्रतिबंधक कायदा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे १२ हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली असून उर्वरित सर्व पात्र उमेदवारांची नावे मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या व वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक विद्याथ्यार्चे नाव मतदार यादीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित प्राचार्यांनी महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मतदार साक्षरता क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

टॅग्स :washimवाशिम