शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 15:15 IST

वाशिम : असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाºया रिक्षाचालक, भाजी विक्रेता, फेरीवाला, कचरा गोळा करणारा, शिलाई कामगार, चर्मकार, घरेलु कामगार, छोटया दुकानात काम करणाºयाकामगार व मजूरांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना लागू झाली असून, या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना सीईओ मीना यांनी केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाºया रिक्षाचालक, भाजी विक्रेता, फेरीवाला, कचरा गोळा करणारा, शिलाई कामगार, चर्मकार, घरेलु कामगार, छोटया दुकानात काम करणाºयाकामगार व मजूरांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना लागू झाली असून, या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना सीईओ मीना यांनी केले. असंघटीत क्षेत्रातील कामगारांना दिलासा म्हणून ही योजना लागू करण्यात आली आहे. १८ ते ४० वर्षे वयोगाटतील तसेच १५ हजारांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असणारे कामगार या योजनेसाठी पात्र आहेत तसेच तो कर्मचारी राज्य विमा निगम, भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद नसावा. जिल्हयातील सर्व असंघटीत कामगारांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ १५ फेब्रुवारी २०१९ रोजी  केला असून याकरीता कामगारांचे वय ६० वर्षे पुर्ण झाल्यानंतर त्यांना दरमहा ३ हजार रुपये मानधन ‘पेंशन’ म्हणून मिळणार आहे. तसेच लाभार्थी कामगारांचा मृत्यु झाल्यास त्याच्या वैवाहिक जोडीदारास योजना सुरु ठेवता येणार असून जर लाभार्थीस सदर योजनेतुन बाहेर पडावयाचे झाल्यास जमा केलेल्या अंशदानासह व्याजाची रक्कम परत मिळणार आहे. सदर योजनेस पात्र असणाºया असंघटीत कामगारास वयनिहाय मासिक वर्गणी कमीत कमी ५५ व जास्तीत जास्त २०० रुपये आकारण्यात आलेली असून तेवढीच मासिक वर्गणी शासन जमा करणार आहे. याबाबत ग्रामपंचायत, नगरपरिषदांनी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही मीना यांनी दिल्या आहेत. या योजनेत सहभागी होणाºया लाभार्थीस इतर कोणतेही शुल्क नागरी सुविधा केंद्र, सी.एस.सी केंद्र येथे अदा करावे लागणार नसून ते शासनाकडून परस्पर अदा करण्यात येणार आहे.जिल्हयातील सर्व असंघटीत कामगारांनी त्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक व भ्रमणध्वनीसह नजीकच्या नागरी सुविधा केंद्र, आपले सरकार कॉमन सर्व्हिस सेंटर येथे जाऊन स्वयंघोषणापत्राचे आधारे योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना