लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील गटग्रामपंचायत हिस्से बोराळा आणि तामसाळा येथे होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान काही लोकांकडून वाद घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ही बाब लक्षात घेवून मतदानदिनाच्या पुर्वसंध्येला आणि मतदानाच्या दिवशी पोलिस संरक्षण पुरवा, अशी मागणी निवडणूकीत उभ्या असलेल्या उमेदवारांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे ३ आॅक्टोबरला ई-मेलव्दारे पाठविलेल्या निवेदनात केली. दरम्यान, त्याची तडकाफडकी दखल घेत निवडणूक आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला पोलिस बंदोबस्त पुरविण्यासंबंधी सूचना दिल्या. विद्यमान सरपंच हुसेन जानीवाले, अनिल घोंगडे, हकीम जानीवाले, गजानन उंडाळ, सुमित्राबाई इंगोले, दिपमाला सरदार, बेबीबाई गोटे, गंगाराम थोरात, संदीप इंगोले, रमेश पट्टेबहादूर या उमेदवारांनी निवेदनात नमूद केले आहे, की ग्रा.पं. हिस्से बोराळा व तामसाळा येथे जनसेवा पॅनलच्या वतीने निवडणूकीत उभे असलेल्या चार उमेदवारांना दहशत व धमकी तंत्राचा वापर करुन नामांकन परत घेण्यास भाग पाडण्यात आले. यापुढेही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वादाच्या घटना घडू शकतात. ही बाब लक्षात घेवून उमेदवारांना पोलिस संरक्षण पुरविण्यात यावे, असे निवेदनात नमूद आहे. दरम्यान, या तक्रारीच्या ‘ई-मेल’ची तडकाफडकी दखल घेत राज्य निवडणूक आयुक्तांनी प्रशासनाला पोलिस बंदोबस्त पुरविण्यासंबंधीच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संभाव्य वाद टाळण्यासाठी ग्रा.पं. निवडणूकीतील उमेदवारांनी मागितले पोलिस संरक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:15 IST
वाशिम: तालुक्यातील गटग्रामपंचायत हिस्से बोराळा आणि तामसाळा येथे होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान काही लोकांकडून वाद घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ही बाब लक्षात घेवून मतदानदिनाच्या पुर्वसंध्येला आणि मतदानाच्या दिवशी पोलिस संरक्षण पुरवा, अशी मागणी निवडणूकीत उभ्या असलेल्या उमेदवारांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे ३ आॅक्टोबरला ई-मेलव्दारे पाठविलेल्या निवेदनात केली. दरम्यान, त्याची तडकाफडकी दखल घेत निवडणूक आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला पोलिस बंदोबस्त पुरविण्यासंबंधी सूचना दिल्या.
संभाव्य वाद टाळण्यासाठी ग्रा.पं. निवडणूकीतील उमेदवारांनी मागितले पोलिस संरक्षण!
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान वाद होण्याची शक्यतापोलिस संरक्षण पुरवा, अशी मागणी उमेदवारांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली