शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्याची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 11:59 IST

Washim News वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण, महाविद्यालय परिसराची स्वच्छता आदी कामे केली जात असल्याचे दिसून येते

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पाचवी ते बारावीनंतर १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केल्यानंतर संस्थाचालक, प्राचार्यांकडून पूर्वतयारी केली जात असल्याचे दिसून येते. कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावी आणि २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. दुसरीकडे मात्र महाविद्यालये सुरू केव्हा होणार? याकडे विद्यार्थ्यांसह प्राचार्य, प्राध्यापकांचे लक्ष लागून होते. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरुवातीला ५० टक्के उपस्थितीत १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. जिल्ह्यात जवळपास २० महाविद्यालये असून, २२ हजारांवर विद्यार्थीसंख्या आहे. पूर्वतयारी म्हणून वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण, महाविद्यालय परिसराची स्वच्छता आदी कामे केली जात असल्याचे दिसून येते.

प्राध्यापकांची कोरोना चाचणी

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. आता महाविद्यालये सुरू होणार असल्याने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व प्राचार्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णयानुसार सर्व  नियमांचे पालन केले जाणार आहे. संपूर्ण वर्ग निर्जंतुकीकरण केले तसेच महाविद्यालय परिसरातील साफसफाई करण्यात आली. - विजयकुमार तुरुकमाने, प्राचार्य बगडिया महाविद्यालय, रिसोड

महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात पूर्वतयारी करण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. - किशोर वाहाणे, उपप्राचार्य, रामराव सरनाइक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcollegeमहाविद्यालय