शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पोहरादेवीत ऐतिहासीक नंगारा महोत्सवाची तयारी अंतीम टप्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 14:32 IST

मानोरा : बंजाराची काशी म्हणुन ओळखल्या जाणाºया तिर्थक्षेत्र पोहरादेवीत ऐतिहासीक नंगारा वास्तुचे भूमिपुजन सोहळा येत्या ३ डिसेंबरला होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : बंजाराची काशी म्हणुन ओळखल्या जाणाºया तिर्थक्षेत्र पोहरादेवीत ऐतिहासीक नंगारा वास्तुचे भूमिपुजन सोहळा येत्या ३ डिसेंबरला होणार आहे. या महोत्सवाची शोभा वाढविण्यासाठी देशभरातुन भाविक लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे. यासाठी महंत समाजाचे नेते आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावत आहे. राज्य शासनाने  पोहरादेवीच्या विकास व्हावा म्हणुन १२५ कोटीचा विकास आराखडा तयार केला. त्यापैकी २५ कोटीच्या विकास कामाला २२ नोव्हेंबर २०१७ रोजी मंजुरात दिली. १३ मार्च रोजी कार्यारंभ ही आदेश दिला,त्यानुसार १.४० कोटीचे भक्त निवास , १.६० कोटींचे खुले सभागृह, ८.८४ कोटीचे वास्तु प्रदर्शनी , केंद्राच्या बांधकामासह २५ कोटीची विविध विकास कामे होणार आहे. धर्मगुरु डॉ.रामराव महाराज यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाक रे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला किमान ५ लाख भाविक उपस्थित  राहतील. यासाठी देशभरातील प्रत्येक राज्यातुन बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावा यासाठी ठिकठिकाणी  बैठका घेवुन पोहरादेवी येथे होत असलेल्या कार्यक्रमाची व्याप्ती व पोहरादेवीच्या विकासाचा आराखडा सामान्य समाज बांधवापर्यंत पोहोचवण्याचे काम युध्द पातळीवर चालु असून यासाठी एक जंबो नियोजन समिती  गठण करण्यात आली आहे. त्या समितीमध्ये इतर राज्यातील सुध्दा प्रतिनिधींना स्थान देण्यात आले आहे . हा सोहळा  एका राजकीय पक्षाचा नसून सर्वांचा असल्याने संपूर्ण बंजारा समाज एकत्रीत झाला आहे. महंतापासुन तर लहान सामान्य व्यक्तीपर्यंत त्याचे कार्यक्रमाचे नियोजन ठरले आहे. कार्यक्रमस्थळी येणाºया सर्व मार्गावर भाविकांना जेवणाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  समाजातील हजारो स्वयंमसेवक स्वयंमस्फुर्तीने सेवा देणार आहे. धर्मगुरु संत डॉ.रामराव महाराज यांच्या ध्वनीफितीव्दारे समाज बांधवांना आवाहनही करण्यात आले आहे. यावेळी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हा सोहळा अधिक व्यापक व्हावा यासाठी संपूर्ण देशात बैठका बोलविल्या आहे.  बारा एकरामध्ये लोकांना  बसण्यासाठी मंडप सज्ज झाला आहे.  तसेच मुख्यमंत्री व उध्दव ठाकरे यांच्या हेलीपॅडचीही व्यवस्था करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमReligious programmeधार्मिक कार्यक्रम