शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वाशिम जिल्हा परिषदेच्या मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 15:09 IST

वाशिम : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव तयार झाला असून, १० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाºयांमार्फत विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला.

ठळक मुद्देमतदारसंघ रचनेचा प्रस्ताव हा अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या आरक्षणासह जिल्हा निवडणूक विभागाने तयार केला.पूर्वीच्या नऊ मतदारसंघातील एक, दोन गावे वगळून दहाव्या नवीन मतदारसंघाची रचना करण्यात आली. या प्रस्तावास २० आॅगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडून मान्यता देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव तयार झाला असून, १० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाºयांमार्फत विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला.येत्या डिसेंबर महिन्यात विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव हा अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या आरक्षणासह जिल्हा निवडणूक विभागाने तयार केला. सन २०११ च्या जनगणनेच्या अनुषंगाने वाशिम तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ वाढला असून, पूर्वीच्या नऊ मतदारसंघातील एक, दोन गावे वगळून दहाव्या नवीन मतदारसंघाची रचना करण्यात आली. पूर्वीच्या काही जिल्हा परिषद मतदारसंघाची नावे ‘जैसे थे’ असून, दहावा नवीन मतदारसंघ कोणता? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. लोकसंख्या व चक्रानुक्रमानुसार एससी, एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासह जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव ९ आॅगस्ट रोजी तहसिल कार्यालयांनी जिल्हाधिकाºयांकडे सादर केला असून, १० आॅगस्टला जिल्हाधिकाºयांनी सदर प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला. प्रारुप मतदारसंघ रचनेच्या या प्रस्तावास २० आॅगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडून मान्यता देण्यात येणार आहे.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोग कामाला लागला असून, राजकीय पक्षांच्या हालचालींनादेखील वेग आल्याचे दिसून येते. केंद्र, राज्यात सत्ता असल्याचा लाभ उचलत जिल्हा परिषदेतदेखील सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपातर्फे जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. शिवसेनेनेदेखील मतदारसंघनिहाय तयारी चालविली असून, तुर्तास शिवसेना-भाजपा युतीबाबत हालचाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. काँग्रेसनेदेखील सत्ता कायम ठेवण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला असून, समविचारी पक्षांसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय आढावा घेत उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याने ग्रामीण भागातील राजकारण तापण्यास सुरूवात झाल्याचे मानले जात आहे. ‘सोशल इंजिनिअरिंग’ची हाक देत भारिप-बमसंनेदेखील निवडणुकीच्या मैदानात उतरत इतर चार प्रमुख पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे. गतवर्षीच्या वाशिम, कारंजा व मंगरूळपीर नगर परिषद निवडणुकीपासून अन्य पक्षही भारिप-बमसंचे ‘राजकीय’ महत्त्व जाणून असल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत आहेत.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद