शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप २०१९ साठी पाणी फाऊंडेशनची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 14:26 IST

जोगलदरी (वाशिम) : पाणी फाऊंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ ची तयारी सुरू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजोगलदरी (वाशिम) : पाणी फाऊंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ ची तयारी सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पहिला टप्पा म्हणून गावांगावात बैठका घेऊन ग्रामस्थांना स्पर्धेची माहिती देण्यासह त्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. या अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथे शुक्रवारी ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील ५९ गावांनी सक्रीय सहभाग नोंदवित जलसंधारणाची कामे करून गाव पाणीदार करण्यासाठी परिश्रम घेतले. या स्पर्धेत मंगरुळपीर तालुक्यातील पारवा आणि कारंजा तालुक्यातील विळेगाव या ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. आता वॉटर कप स्पर्धा २०१९ ची तयारी सुरू करण्यात आली असून, या स्पर्धेत गावांना सहभागी करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन करण्यासाठी गावागावांत बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. या बैठकीत ग्रामस्थांना स्पर्धेविषयी सवीस्तर माहिती देऊन स्पर्धेत सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथे शुक्रवारी ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक  सुभाष नानोटे, तालुका समन्वयक समाधान वानखडे, प्रशांत मनवर, अतुल तायडे यांनी ग्रामस्थांना स्पर्धेचे स्वरुप आणि सहभागाच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. बैठकीला अनिल महाराज, शेषराव पवार, मनोज चव्हाण, यशपाल चव्हाण, मधुकर चव्हाण, प्रकाश गिद, शालिकराम सोनोने, भागीरथ सोनोने, नामदेव मनवर, गोवर्धन जाधव, उकंडा चव्हाण, अनिल चव्हाण, सेवाराम राठोड, शामराव पवार, गणेश चव्हाण, दिलिप जाधव, रमेश पवार, अशोक राठोड, गजानन डुकरे, मनोज पवार आदि ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा