शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाची तयारी; जिल्हा परिषदेत बैठक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 14:20 IST

वाशिम: जिल्ह्यात येत्या २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरदरम्यान राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात येत्या २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरदरम्यान राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी १८ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुख व समन्वय समितीची बैठक पार पडली.मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कक्षात पार पडलेल्या या बैठकीत सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. दिपक सेलोकार यांनी कुष्ठरुग्ण शोध अभियानाची माहिती देण्यात आली. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात ११२२ पथकांद्वारे १० लाख ९१ हजार ७२४ लोकांची तपासणी करण्यात येणार आहे हे अभियान प्रामुख्याने झोपडपट्टीसह इतर निवडक भागांत राबविण्यात येणार आहे. या अभियानात प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र स्तरावरील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक (पुरुष, महिला), आरोग्य सेवक (पुरुष, महिला), आशासेविका आणि पुरुष स्वयंसेवक यांचा सहभाग राहणार आहे. कुष्ठरोगाची लागण झालेले; परंतु उपचाराखाली नसलेले रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणत विना विकृत बरे करणे, हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने स्वत:ची कुष्ठरोग व त्वचारोग तपासणी करण्यासाठी तपासणी करणाºया पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद