शिखरचंद बागरेचा/वाशिम
भारतीय संस्कृतीत उत्साहवर्धक साजरा करण्यात येणारा सण म्हणजेच दिवाळी. सर्वांना सहजीवनाचा आनंद देणार्या दिवाळीचा सण धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपुजन, पाडवा, भाउबीज असे पाच दिवस दिवाळी म्हणून साजरी करण्याची पंरपरा आहे. या पर्वकाळात नवनविन कपडे घेणे वेगवेगळे मिष्ठान्न व भौतीक वस्तुंची खरेदीसह फटाके उडवून आनंद घेण्याची पंरपरा फार पुर्वी काळापासून जोपासली जाते मात्र फटा क्यांच्या या आतीषबाजीमुळे आरोग्यासह पर्यावरणावर मोठा दुष्परिणाम होत आहे असा सुर लोकमत परिचर्चेत मान्यवरांनी व्यक्त केला. स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालय येथे आतीषबाजीने आरोग्य व पर्यावरण यावर होणारे दुष् पपरिणाम या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत शहरातील सामाजिक कार्यकर्ते अनिल केंदळे, डॉ.सुभाष मानधने, माळी कर्मचारी सेवा मंडळाचे अध्यक्ष केशवराव खासबागे, साने गुरुजी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मधूकर महाले, प्रयोगशाळा परिचर अनिल कदम, वाशिम अर्बन बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक किशोर रंधवे आदी मान्यवरांनी सहभाग घेतला होता. दिवाळी पर्व काळात होणारी फटाक्यांची आतषबाजी दिवसेंदिवस मोठया प्रमाणात होत असून त्याचा मानवी जीवनात शारिरीक दुखापतीसह पर्यावरणावर मोठा दुष्परिणाम होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. फटाक्यांच्या धुरामुळे दमा आजार असणार्यांना श्वास घेण्यास त्रास होतो याशिवाय धुरामुळे कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाणात वाढ होवून शुद्ध हवा प्रमाणात मिळते तर वातावरणातील सात्वीकता नष्ट होते. म्हणूान नुकसानदायक असलेले फटाके फोडण्यावर प्रत्येकाने नियंत्रण ठेवले पाहीजे, असे मत यावेळी लोकमतच्या परिचर्चेत उपस्थितांनी व्यक्त केले.