शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 14:34 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथे २ जूनपासून सदर मोफत प्रशिक्षण वर्गास प्रारंभ झाला. 

ठळक मुद्देनवव्या तुकडीचा शुभारंभ जिल्हा उपनिबंधक रमेश एन. कटके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. जकुमार पडघान यांनी जिल्हा स्पर्धा परीक्षेत तयारी व वेळेचे नियोजनाबद्दल माहिती दिली.

वाशिम - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथे २ जूनपासून सदर मोफत प्रशिक्षण वर्गास प्रारंभ झाला. 

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना बँक, रेल्वे, एलआयसी व तत्सम लिपिकवर्गीय पदांच्या तयारीसाठी वाशिम येथे मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिले जाणार असून, नवव्या तुकडीचा शुभारंभ जिल्हा उपनिबंधक रमेश एन. कटके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान उपस्थित होते. यावेळी कटके म्हणाले की, युवकांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांची दालन खुले आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वांनी योग्य मार्गदर्शनात अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत दिल्या जाणारे प्रशिक्षण  महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यात मिळण्यासाठी संस्थेने परिश्रम घेतले असून, यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. राजकुमार पडघान यांनी जिल्हा स्पर्धा परीक्षेत तयारी व वेळेचे नियोजनाबद्दल माहिती दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  डॉ. गजपाल पी. इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाधिकारी संजय इंगोले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या प्रवाहात यावे व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण व अन्य उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक प्रविण खाडे यांनी  तर संचालन अमोल पाईकराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसेनजीत धडे, दीपक कांबळे, निलेश इंगोले यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणार्थींना ३ हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन आणि २ हजार रुपये किंमतीचा पुस्तक संच देण्यात येणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र