वाशिम - वाशिम तालुक्यातील टो गावातील वीजपुरवठा गत आठ दिवसांपासून खंडित असल्याने ग्रामस्थांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.महावितरणने थकित वीज देयकाची वसूली करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे तर दुसरीकडे वीज पुरवठ्यातील तांत्रिक बिघाडाची दुरूस्ती तातडीने करण्याकडे पाठ फिरविल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. टो येथील रोहित्रात बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. तापमानाचा पारा चढत असतानाच, वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक घामाघूम होत आहेत. वीजपुरवठा खंडित असल्याने विद्युत उपकरणे शोभेची वस्तू बनली आहेत.
टो येथील वीजपुरवठा आठ दिवसांपासून खंडित
By admin | Updated: April 6, 2017 19:46 IST