कारंजा (जि. वाशिम): दीर्घ कालावधीनंतरही कारंजा तालुक्यातील विशेष घटक योजनेच्या ११३ लाभार्थी शेतकर्यांना कृषी पंप जोडणी मिळाली नाही. २0११-१२ मध्ये या शेतकर्यांची मोफत कृषी पंप जोडणी योजनेत निवड झाली होती. बिलाच्या थकीत रकमेपोटी तातडीने कृषी पंप जोडणीचा दंडुका उगारणारी वीज वितरण कंपनी कृषी पंप जोडणी देण्यात तेवढी तत्पर नसल्याचा प्रत्यय कारंजा तालुक्यातील शेतकर्यांना येत आहे. दारिद्रय़रेषेखाली जीवन जगणार्या अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून १९८२ पासून राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये विशेष घटक योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत नवीन विहिरीसह विविध प्रकारच्या १४ ते १६ बाबींवर अनुदान दिले जाते. २0११-१२ मध्ये विशेष घटक योजनेच्या विविध उपक्रमांतर्गत घेतलेल्या विहिरींवर कृषी पंप बसविणे आणि वीज जोडणी देण्याच्या उपक्रमाचा यामध्ये समावेश करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि जिल्हा नियोजन विकास समितीमधून निधीची तरतूद करण्यात आली. २0११-१२ आणि २0१२-१३ या वर्षात कारंजा तालुक्यातील ३४२ लाभार्थ्यांंंची मोफत कृषी पंप जोडणीसाठी निवड झाली होती. यापैकी नऊ लाभार्थ्यांंंनी यापूर्वीच वीज जोडणी घेतल्याने ३३३ लाभार्थ्यांंंना वीज जोडणी मिळणे अपेक्षित आहे. डिसेंबरअखेर २२0 लाभार्थ्यांंंना वीज जोडणी मिळाली असून, ११३ लाभार्थ्यांंंना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. वीज जोडणीसाठी प्रत्येक लाभार्थी ६६५0 रुपयांप्रमाणे शासनाने एप्रिल ते मे २0१२ मध्ये अध्र्यापेक्षा अधिक वीज जोडणीचे शुल्क वीज वितरण कंपनीच्या खात्यात जमा केले. उर्वरित शुल्काची तरतूद जिल्हा नियोजन विकास समितीमधून करण्यात आली; मात्र चार वर्षे लोटल्यानंतरही ११३ शेतकर्यांची कृषी पंप जोडणी पूर्णत्वाकडे गेली नाही. ११३ कृषी पंप जोडण्या रखडल्याने या शेतकर्यांना सिंचन करण्यापासून वंचित राहावे लागले.
विशेष घटक योजनेच्या ११३ लाभार्थ्यांंची वीज जोडणी रखडली
By admin | Updated: January 25, 2016 02:11 IST