शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सेवा केंद्रांमधील ‘पॉस मशीन’ धूळ खात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 18:36 IST

वाशिम : सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना ‘आॅनलाईन’ पद्धतीने खत व बियाण्यांची विक्री करणे बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्रांना ‘पीओएस’ (पॉस) मशिन देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातील बहुतांश मशीन वापराअभावी धूळ खात पडल्या असून शासनाच्या मूळ उद्देशाला यामुळे हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांना मशीन वापरासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षणही देण्यात आले. गतवर्षी देखील अनेक कृषी सेवा केंद्रांनी पॉस मशीनचा वापर न करता प्रचलित पद्धतीनेच बियाणे व खत विक्री केले. यंदाही जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये पॉस मशीन दर्शनी भागात लावल्याचे दिसत नाही.

वाशिम : सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना ‘आॅनलाईन’ पद्धतीने खत व बियाण्यांची विक्री करणे बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्रांना ‘पीओएस’ (पॉस) मशिन देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातील बहुतांश मशीन वापराअभावी धूळ खात पडल्या असून शासनाच्या मूळ उद्देशाला यामुळे हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने अनुदानित खतांच्या विक्रीतील गैरप्रकार टाळण्यासाठी गतवर्षीच्या खरीप हंगामापासून पॉस मशीनने शेतकºयांना अनुदानित खत वितरण करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या ‘डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर’ या योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांना मशीन वापरासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षणही देण्यात आले. मात्र, गतवर्षी देखील अनेक कृषी सेवा केंद्रांनी पॉस मशीनचा वापर न करता प्रचलित पद्धतीनेच बियाणे व खत विक्री केले. यंदाही जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये पॉस मशीन दर्शनी भागात लावल्याचे दिसत नाही. त्यामुळे अनुदानित खतविक्रीत पुन्हा एकवेळ ‘गौडबंगाल’ होण्याची शक्यता सुज्ञ शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. 

जिल्ह्यातील सर्वच नोंदणीकृत कृषी सेवा केंद्र संचालकांना पॉस मशीन हाताळण्यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांनी यामाध्यमातूनच अनुदानित खते व बियाण्यांची विक्री करावी. असे झाले तरच शेतकºयांचाही फायदा होईल. या प्रक्रियेकडे जिल्हा परिषदेचा कृषी विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे.  - नरेंद्र बारापत्रे, कृषी विकास अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमMarketबाजार