शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीमुळे माठ विक्रेते अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 12:21 IST

Washim News : रांजण, माठ आदी माल हा जागेवरच पडून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संचारबंदीच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, याची झळ माठ विक्रेत्यांना बसत असल्याचे दिसून येते. रांजण, माठ आदी माल हा जागेवरच पडून आहे.गतवर्षी साधारणत: मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश लागू आहेत. यामुळे लघू व्यावसायिक अडचणीत आल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहेत. कुंभार समाजबांधवांनी बनविलेल्या माठविक्रीचा मुख्य हंगाम हा उन्हाळ्यातील असतो. मार्च, एप्रिल व मे महिन्यात माठाची विक्री केली जाते. साधारणता ऑक्टोबरपासून माठ व रांजन बनविण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. घरगुती माठापासून तर मोठे माठ व पाणपोईचे रांजण बनवीने व मार्च, एप्रिल, मे महिन्यात विक्री करणे हा मुख्य व्यवसाय असतो. गतवर्षीही कडक लॉकडाऊन असल्याने व्यवसायाला फटका बसला. आताही संचारबंदीचे सुधारीत आदेश असल्याने व्यवसायाला फटका बसत आहे. ग्राहकांनी पुन्हा या माठ विक्रेत्यांकडे पाठ फिरवली असल्याने, बनविलेला माल तसाच पडून असल्याचे चित्र वाशिम शहरात पाहावयास मिळत आहे. लागोपाठ दोन हंगाम हातातून गेल्याने उदरनिर्वाह कसा करावा, असा पेच माठ विक्रेत्यांसमोर निर्माण होत आहे.

टॅग्स :washimवाशिम