शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज आॅफलाईन पद्धतीनेही स्विकारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 19:40 IST

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे नूतनीकरणचे अर्ज ‘महाईस्कॉल’ प्रणालीवर नुतनीकरण करण्याचे तसेच नवीन अर्ज आॅफलाईन पध्दतीने सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त ए.व्ही. मुसळे यांनी केले.

ठळक मुद्देसामाजिक न्याय विभाग ७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सामाजिक  न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार्‍या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे सन २०१७-१८ मधील अर्ज माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून विकसित करण्यात आलेल्या ‘महाडीबीटी’ पोर्टलवरुन मागविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता. महाडीबीटी पोर्टलवरील संगणकीय प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झालेली नसल्याने सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता) योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे नूतनीकरणचे अर्ज ‘महाईस्कॉल’ प्रणालीवर नुतनीकरण करण्याचे तसेच नवीन अर्ज आॅफलाईन पध्दतीने सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त ए.व्ही. मुसळे यांनी केले.नूतनीकरणचे अर्ज सादर करताना ‘महाईस्कॉल’ या जुन्या प्रणालीवरील सन २०१६-१७ या वर्षातील  महाविद्यालयामध्ये प्रवेशित व नोंदणीकृत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज सन २०१७-१८ या वर्षामध्ये संबंधीत महाविद्यालयामार्फत पुर्वीप्रमाणेच ‘महाईस्कॉल’ प्रणालीवरील कार्यपध्दतीनुसार नुतनीकरण करुन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे ७ फेब्रुवारी २०१८ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. नवीन अर्ज करताना सन २०१७-१८ करीता महाविद्यालयात ज्या नवीन (फ्रेश) प्रवेशित विद्यार्थ्यांनी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर अर्जाची नोंदणी केलेले विद्यार्थी व तांत्रिक अडचणीमुळे महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करु न शकलेल्या अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘महाईस्कॉल’ प्रणालीवर अपलोड करण्यात आलेल्या अर्जाच्या नमुन्यात महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज आॅफलाईन पध्दतीने स्विकारुन ते सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास ७ फेब्रुवारी २०१८ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांची अनुज्ञेय संपुर्ण रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर होणार असल्याने विद्यार्थी व महाविद्यालयाने विहित अटी व शर्ती नमुद असलेल्या बंधपत्रासह प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करावे, असे आवाहन मुसळे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना