शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘लाल्या’मुळे कपाशी उत्पादनात घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 13:21 IST

वाशिम : बोंडअळीमुळे कपाशीचे आधिच नुकसान झाले असताना आता या पिकावर लाल्या रोगाचा प्रादूर्भाव होत आहे , यामुळे उत्पादनात आणखी घट होणार असल्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. 

वाशिम : बोंडअळीमुळे कपाशीचे आधिच नुकसान झाले असताना आता या पिकावर लाल्या रोगाचा प्रादूर्भाव होत आहे , यामुळे उत्पादनात आणखी घट होणार असल्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. कृषी विभागाकडून पिकांची पाहणी सुरु झाली आहे. कृषी विभागाने शेतकºयांना नुकसानापासून वाचविण्यासाठी योग्य  मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे. जिल्हयात गतवर्षी कपाशीवर बोंडअळींचा मोठया प्रमाणात प्रादूर्भाव झाल्याने शेतकºयांनी यंदा या पिकाकडे पाठ फिरविल्याचे यावर्षी झालेल्या पेºयावरुन दिसून येते. गतवर्षी ३१ हजार हेक्टरवर असलेले कपाशीचे क्षेत्र यंदा १८ हजार ६०० हेक्टरपर्यंत मर्यादित झाले आहे. कृषी विभागाने यंदा कपाशीला बोंडअळीपासून वाचविण्यासाठी पेरणी काळापासूनच शेतकºयांना मार्गदर्शन केले.  तरी कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भव झाला आणि कपाशीचे पीक यंदाही हातचे जाण्याची भिती वाढली होती. दरम्यान आॅगस्टमध्ये जोरदार पाऊस आल्याने या किडीला अटकाव झाला. परंतु परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने कपाशी पिक संकटात सापडले. कोरडवाहू शेतजमिनीला तडा पडू लागल्या दिवसाच्या आणि रात्रीच्या वातावरणात विषमता निर्माण झाली. आणि मुळाव्दारे घटकद्रव्ये शोषण्याची कपाशीची क्षमता कमी होत गेल्याने  या पिकावर आता लाल्याचा प्रकोप होत असल्याचे चित्र आहे. कपाशीच्या पेरणीला दीड महिना झाला असून आता पुढे पुन्हा एवढाच कालावधी या पिकाला लाल्या रोगाचा धोका कायम राहणार आहे.  त्यातच हलक्याप्रतिच्या शेतजमिनीवरील कपाशीत या रोगाचे प्रमाण अधिक असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या रोगाचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे.

वातावरणातील बदलामुळे कपाशीवर लाल्याचा प्रादूर्भाव होत आहे. या पृष्ठभूमिवर कृषी विभागाने कपाशीची पाहणी सुरु केली असून या रोगावर नियंत्रणासाठी शेतकºयांनी दोन ओळींच्या अंतराने पाणी द्यावे, तसेच नत्राचे प्रमाण कमी झाल्याचे वाटत असल्यास ते वाढविण्याचा प्रयतन करावा आणि एक टक्का मॅग्नेशिअम सल्फेट व दोन टक्के डिएपीची पिकावर फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागाचेवतिने करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमcottonकापूसagricultureशेती