मानोरा :तालुक्यातील देवठाणा गाव तलावातील पाणी साठा यावर्षीच्या उन्हाच्या दाहक तेने आटला असुन हा तलाव कोरड स्थिती पडुन आहे. गेल्यावर्षी पावसाळा अधिक झाला. त्यामुळे कालवा, धरण, तलाव नदी नाल्यातुन धो-धो पाऊस त्यावेळी वाहत होते.मानोरा तालुक्यातील भिलडोंगर, रुई , तलाव, गिद तलाव, आसोला,गव्हा कालवा, आमदरी तलाव, रतनवाडी तलाव, फुलउमरी तलाव,पंचाळा, चिखली येथील तलाव शंभर टक्के जलसाठ्याने भरुन ओव्हरफ्लो झाले होते.परंतु यावर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच कडक उन्हाळा लागला असल्यामुळे सुर्य आग ओकत असल्याची स्थिती पहावयास मिळत आहे. कडक उन्हाच्या दाहकतेने नागरिकांचा जीव लाही लाही होत आहे.
देवठाणा येथील तलाव कोरडाठण्ण
By admin | Updated: April 27, 2017 13:53 IST