मानोरा (जि. वाशिम) : पल्स पोलिओ मोहीमेत मानोरा तालुक्यातील १६३३३ पैकी तालुक्यातील १५४९0 बालकांना २२ फेब्रुवारीला पोलिओ डोज पाजण्यात आले. मानोरा तालुक्यातील लाभार्थी बालकांच्या टक्केवारीचा विचार केल्यास पल्स पोलिओ मोहिम ९४.८३ टक्के यशस्वी झाली. मानोरा तालुक्यात तिन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यात कुपरा ७६४५, पोहरादेवी-५१४१, शेदुरजंना-३५४३ अश्या प्रकारे अपेक्षीत लाभार्थी १६३३३ यापैकी १५४९0 बालकांना पल्स पोलिओ डोज देण्यात आले, अशी माहिती तालुका आरोग्य कार्यालयाचे सहा. तालुका आरोग्य अधिकारी आर.व्ही.मानले यांनी सांगितले.
मानोरा तालुक्यात १५ हजार बालकांना पोलिओ डोज
By admin | Updated: February 27, 2015 00:48 IST