शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीने तापले राजकारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:18 IST

वाशिम : जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त तीन जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीने प्रमुख पक्षांमधील राजकारण तापविले असून, अंतिम मुदतीपर्यंत किती अर्ज दाखल होतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

ठळक मुद्देअर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत आज होणार चित्र स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त तीन जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीने प्रमुख पक्षांमधील राजकारण तापविले असून, अंतिम मुदतीपर्यंत किती अर्ज दाखल होतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या मतदारसंघातून ही निवडणूक होणार आहे. लहान नागरी क्षेत्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्गातील स्त्री, सर्वसाधारण प्रवर्गातील स्त्री असे एकूण तीन सदस्य निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीत वाशिम, रिसोड, मंगरूळपीर व कारंजा नगर परिषदेतील निर्वाचित सदस्य मतदान करण्यास पात्र असणार आहेत. जवळपास १00 च्या आसपास मतदार आहेत. २२ ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला. मात्र, अद्यापपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नसून, २८ ऑगस्ट ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. अंतिम मुदतीपर्यंत नेमके किती अर्ज दाखल होतात, यावर या निवडणुकीतील लढती अवलंबून राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  साधारणत: १0 महिन्यांपूर्वी वाशिम, कारंजा, मंगरूळपीर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. कारंजाचा अपवाद वगळता वाशिम व मंगरूळपीर नगर परिषदेत शिवसेना-भाजपा या पक्षाने बर्‍यापैकी जागा मिळविल्या, तर कारंजा नगर परिषदेत भारिप-बमसंने सर्वाधिक जागा मिळवित निर्विवाद सत्ता हस्तगत केली. रिसोड नगर परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. निवडून येण्यासाठी सदस्य संख्या जुळविण्यात शिवसेना, भाजपा, भारिप-बमसंसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते फिल्डिंग लावण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर त्याचदिवशी वैध उमेदवारी अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाईल. फेटाळलेल्या उमेदवारी अर्जाविषयी ३१ ऑगस्ट २0१७ पयर्ंत जिल्हाधिकार्‍यांकडे अपील करता येणार आहे. अपिलानंतर वैध उमेदवारी अर्जाची यादी ४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर असून, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपयर्ंत मतदान होईल. १५ सप्टेंबर २0१७ रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. या निवडणुकीत शिवसेना व भाजपाची युती होते, की दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जातात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारंजा, वाशिम व मंगरूळपीर नगर परिषदेच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमध्ये पहिल्यांदाच भारिप-बमसंचा उमेदवार पाठविण्याच्या दृष्टीने भारीप-बमसंनेही व्यूहरचना आखल्याची चर्चा आहे. वाशिम, कारंजा व मंगरूळपीर या तीनही नगर परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरेशे संख्याबळ नसल्याने उमेदवार निवडून आणण्यासाठी दिग्गज नेत्यांचे कसब पणाला लागणार, असे बोलले जात आहे.