शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘ईडी’च्या चाैकशीनंतर आता वाशिम जिल्ह्यात तापणार राजकीय वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 11:00 IST

Washim News : खासदार भावना गवळी यांच्या ईडीची चाैकशी सुरू झाल्याने भाजप कार्यकर्ते जाेमात दिसून येत आहेत.

- नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   जिल्ह्यात भाजपा व शिवसेना लाेकप्रतिनिधींनी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आराेपाने आधीच जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यात खासदारांच्या शिक्षण संस्थांची ईडीकडून चाैकशी झाल्याने आता आम्हीही स्वस्थ बसणार नाही, असे वातावरण शिवसेनेत दिसून येत असल्याने, राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर ईडीची चाैकशी सुरू झाल्याने भाजप कार्यकर्ते जाेमात दिसून येत आहेत.भाजपा नेते किरीट साेमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्या संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला असून, याची चाैकशी करण्याची मागणी केली हाेती. त्यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन चांगलेच वादंग झाले हाेते. किरीट साेमय्या यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्याच दिवशी खासदार भावना गवळी यांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी कुटुंबीयांनी ५०० काेटी रुपयांचा जमीन व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आराेप केला हाेता. या आराेप-प्रत्याराेपामुळे दरराेज राजकीय घडामाेडी सुरू झाल्यात. त्या आजतागायत सुरू असून, अचानक ३० ऑगस्ट राेजी खा.भावना गवळी यांच्या ५ संस्थांची चाैकशी ईडीकडून करण्यात आली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आता आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रकरणांची पाेलखाेल केल्या जाणार असल्याची चर्चा हाेत आहे. यामुळे निवडणुका नसल्या, तरी वाशिम जिल्ह्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापलेले दिसून येत आहे. यापुढे ते अधिक तीव्र हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजप व शिवसेना लाेकप्रतिनिधींमध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र जिल्ह्यात असून, इतर राजकीय पक्ष आपल्या कार्यात मग्न दिसून येत आहेत.

साेशल मीडिया शांतखासदार व आमदार यांनी भ्रष्टाचार केल्याच्या आराेपांच्या फैरी दहा दिवसांपूर्वी सुरू झाल्या हाेत्या, तेव्हा साेशल मीडियावर चांगल्याच गाजत हाेत्या, परंतु ईडीने चाैकशी केल्यानंतर साेशल मीडियावर शांतता दिसून आली. दाेन्ही राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काेणत्याच प्रकारची पाेस्ट पेस्ट केल्याचे दिसून आले नाही. या कारवाईने ‘कही खुशी कही गम’चे वातावरण दिसून आले असले, तरी इतर व्हाॅट्सॲप ग्रुप, फेसबुकवरही काेणी काॅमेन्टस केल्याचे दिसून आले नाही.

आराेप-प्रत्याराेप चाैकशीत विकास पडला मागेगत ११ दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेले राजकीय आराेप-प्रत्याराेप व आता ईडीकडून चाैकशीने राजकीय वातावरण तापल्याने विकास कार्य मागे पडले आहे. या आराेप-प्रत्याराेपात राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते गुंतल्याने विकास कामाऐवजी, नागरिकांच्या समस्या बाजूला सारल्या गेल्या आहेत. एकमेकांचे उणेदाणे काढण्यातच वेळ जात असल्याचे चित्र वाशिम येथील राजकारणात सद्यस्थितीत दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमBhavna Gavliभावना गवळी