पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी चालक शम्मी हिरा कलरवाले रा.कोळंबी ता. मंगरुळपीर हा चालवित असलेल्या एमएच - ३७ - टी - ११८४ क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात अंदाजे ६५०० रुपये किमतीचा १३ कट्टे तांदूळ, तसेच वाहन, कासम हुसेन परसुवाले रा.कोळंबी ता.मंगरुळपीर हा चालवित असलेल्या एमएच-२९, एम-६९३४ क्रमांकाच्या वाहनांतील अंदाजे ६००० रुपये किमतीचा १२ कट्टे तांदुळ, २२५० रुपये किमतीचा ३ कट्टे गहू तसेच वाहन आणि इमरान रमजान नुरीवाले रा.कोळंबी ता.मंगरुळपीर हा चालवित असलेल्या एमएच-२९, सी-९५३५ क्रमांकाच्या वाहनांतील अंदाजे ८ हजार रुपये किमतीचा १६ कट्टे तांदुळ व वाहन, असे एकूण तीन वाहनांतील धान्य व वाहने मिळून २,८२,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांचे मार्गदर्शनात पोउनि गणेश कोथळकर, पोहेका माणिक चव्हाण, रवींद्र कातखेडे, प्रवीण माळकर, हीतेश चोपडे, राम राऊत यांनी केली.
धान्याची वाहतूक करणारी तीन वाहन पोलिसांनी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST