शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

६०० बालकांना दिली न्यूमोकोकल क्वांजुगेट लस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:41 IST

वाशिम : एका वर्षाच्या आतील बालकांचे न्यूमोकोकल या जिवाणूमुळे होणाऱ्या न्यूमोनिया आणि मेनिनजायटिस या आजारापासून रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात १२ ...

वाशिम : एका वर्षाच्या आतील बालकांचे न्यूमोकोकल या जिवाणूमुळे होणाऱ्या न्यूमोनिया आणि मेनिनजायटिस या आजारापासून रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात १२ जुलैपासून न्यूमोकोकल क्वांजुगेट लसीकरणाचा (पीसीव्ही) शुभारंभ झाला असून, आतापर्यंत ६ आठवड्यांच्या अर्थात दीड महिन्याच्या ६०० बालकांना पहिला डोस देण्यात आला.

न्यूमोकोकल आजारामुळे बाधित बालकांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते किंवा काही बाधित बालकांचा मृत्यूदेखील होण्याची शक्यता असते. बॅक्टेरियल न्यूमोनिया हे पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे. पीसीव्ही ही लस बालकांना होणाऱ्या तीव्र स्वरूपातील न्यूमोनियाचे प्रमुख कारण असलेल्या न्यूमोकोकल न्यूमोनियापासून बालकांचे संरक्षण करण्याचे प्रभावी साधन आहे. सर्व शासकीय आरोग्य संस्थेत ही लस बालकांना मोफत देण्यात येत आहे. बालकांना या लसीमुळे कोणतीही रिअ‍ॅक्शन येत नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी स्पष्ट केले.

--------------------------------बॉक्स...

न्यूमोकोकल क्वांजुगेट लस आवश्यक का?

दोन वर्षांच्या आतील बालकांना स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी बॅक्टेरियामुळे न्यूमोनिया हा आजार होण्याचे प्रमुख कारण आहे. न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसन मार्गाला होणारा आजार आहे. त्यामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो. प्रसंगी मुले बेशुद्ध होऊ शकतात व मृत्यूदेखील होऊ शकतो. हे गंभीर परिणाम टाळण्यासाठी पात्र बालकांना न्यूमोकोकल क्वांजुगेट लस देणे आवश्यक आहे.

-----------------------बॉक्स...

तीन डोसमध्ये दिली जाते लस !

‘पीसीव्ही’ लसीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. ही लस तीन डोसमध्ये देण्यात येते. पहिला डोस हा बालकाला वयाच्या ६ आठवड्यांत, दुसरा डोस १४ आठवड्यांत आणि तिसरा बूस्टर डोस वयाच्या ९ व्या महिन्यात किंवा जास्तीत जास्त वयाच्या पहिल्या वर्षी देता येतो.

--------------------------बॉक्स...

जिल्हा कृती दलाची सभा

पीसीव्ही लसीच्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा कृती दलाची सभा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, कृती दलाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी गावंडे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेकडून आढावा घेतला.

------------------------------

लसीचे एकूण प्राप्त डोस - १२००

किती बालकांना दिली लस - ६००

--------------------------खासगी रुग्णालयात लसीची किंमत - ५०००

सरकारी रुग्णालयात - लस मोफत