शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
2
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
3
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
4
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
5
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
6
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
7
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
8
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
9
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...
10
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
11
Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!
12
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
13
भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....
14
दिवसभर केलं शूट, इंटिमेट सीननंतर झाल्या वेदना; 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
15
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
16
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
17
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
18
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
19
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
20
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस

प्लास्टिक बंदीमुळे दूधडेअरीवाले अडचणीत: भांडे घेऊन येण्याची सुचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 6:41 PM

दूधडेअरीधारकांनी प्लास्टिकचा त्याग केला असून, आता ग्राहकांना दुधासाठी घरूनच भांडे आणण्याची सुचना ते करीत आहेत.

ठळक मुद्देव्यावसायिक प्लास्टिकपासून चार हात दूरच झाले आहेत, तर ग्राहकांनीही प्लास्टिकचा हट्ट सोडला आहे;धान्य, कपडे, फळे यासाठी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर सहज शक्य असला तरी, तरल पदार्थांच्या खरेदी विक्रीत मात्र प्लास्टिकबंदीने मोठी पंचाईत केली आहे.प्लास्टिक पिशव्या बंद केल्या असून, दुधासाठी येणाºया ग्राहकांना ते भांडे घेऊन येण्याच्या सुचना करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यभरात प्लास्टिक बंदीची मोहिम कठोरपणे राबविण्यात येत असताना विविध व्यावसायिकांनी त्याचा मोठा धसका घेतला आहे. तथापि, जड पदार्थांची बांधणी करण्यासाठी कागदी पिशव्या, कापडी पिशव्यांसारखे पर्याय असले तरी तरल पदार्थ त्यातही प्रामुख्याने दूधाच्या विक्रीत मोठ्या अडचणी आल्या आल्या आहेत. दूधडेअरीधारकांनी प्लास्टिकचा त्याग केला असून, आता ग्राहकांना दुधासाठी घरूनच भांडे आणण्याची सुचना ते करीत आहेत.राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी मोहिमेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसह संबंधित प्रशासनाकडून बाजारपेठा, किरकोळ दुकाने, भाजीबाजारांवर बारिक नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे. प्लास्टिकचा वापर करणाºयाला ५ हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत दंडाची तरतूद असून, त्याचा फटकाही अनेकांना या बंदीच्या पहिल्याच दिवशी अनुभवायला मिळाला. त्यामुळे व्यावसायिक प्लास्टिकपासून चार हात दूरच झाले आहेत, तर ग्राहकांनीही प्लास्टिकचा हट्ट सोडला आहे; परंतु भाजीपाला, धान्य, कपडे, फळे यासाठी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर सहज शक्य असला तरी, तरल पदार्थांच्या खरेदी विक्रीत मात्र प्लास्टिकबंदीने मोठी पंचाईत केली आहे. यामध्ये दूधडेअरीधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर्वी आकारमानानुसार प्लास्टिक पिशवीत दूध मोजून देऊन ते जागेवरच सीलही करून दिले जायचे; परंतु आता मात्र प्लास्टिक बंदी झाल्याने त्यांनी प्लास्टिक पिशव्या बंद केल्या असून, दुधासाठी येणाºया ग्राहकांना ते भांडे घेऊन येण्याच्या सुचना करीत आहेत.  प्लास्टिकचा खर्च वाचला; परंतु मशीनचा बोजा वाढला.शासनाने प्लास्टिकबंदी केल्यानंतर व्यावसायिक ग्राहकांना एकतर कागदात वस्तू बांधून देत आहेत किंवा पिशव्या आणण्याच्या सुचना करीत आहेत. त्यामुळे त्यांचा प्लास्टिकचा खर्च वाचला आहे. दूधडेअरीधारकांना या बंदीचा एकप्रकारे मोठा फायदाच झाला असे म्हणता येईल. कारण जडवस्तूंसाठी पूर्वीही व्यावसायिक पेपरची रद्दी वापरत किं वा खरेदीचे प्रमाण अधिक असले तर ग्राहकही कापडी पिशव्या नेत असत. दुधडेअरीत मात्र केवळ प्लास्टिकचाच अधिक वापर होत असे. आता प्लास्टिकबंदीमुळे त्यांचा मोठा खर्च वाचला; परंतु प्लास्टिकमध्ये दूध टाकल्यानंतर ते सील करण्यासाठी घेतलेल्या मशीन मात्र निकामी झाल्या आहेत. त्या कोणी विकतही घेणार नसल्याने या मशीनचा बोजाच दूधडेअरीधारकांना झाला आहे.

टॅग्स :Washim Anti corruption departmentवाशिम लाच-लुचपत प्रतिबंधक विभागmilkदूध