शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमीन आणि बांधावर रोजगार हमीतून वृक्षलागवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 17:26 IST

  वाशिम : विशिष्ट प्रवर्गातील शेतकºयांच्या मालकीच्या शेतजमिनींवर आणि बांधांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे.

ठळक मुद्दे सामाजिक वनीकरण शाखेमार्फत त्याची अंमलबजावणी होईल, असे रोजगार हमी योजना विभागाकडून सांगण्यात आले.रोजगार हमी योजनेतील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.

 वाशिम : विशिष्ट प्रवर्गातील शेतकºयांच्या मालकीच्या शेतजमिनींवर आणि बांधांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे. सामाजिक वनीकरण शाखेमार्फत त्याची अंमलबजावणी होईल, असे रोजगार हमी योजना विभागाकडून सांगण्यात आले.अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, स्त्री -कर्ता असलेली कुटुंब, शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेली व्यक्ती, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी अधिनियम २००६ चे लाभार्थी यांना या योजनेचा  लाभ दिला जाईल. या प्रवर्गातील पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर २००८ च्या कृषी कर्जमाफी व कर्ज सहाय योजनेत व्याख्या केलेल्या लहान तसेच सीमांत भूधारक शेतकºयांच्या जमिनीवरील कामांच्या व शर्तीच्या अधीन राहून या योजनेत प्राधान्य दिले जाईल.दरम्यान, योजनेतील लाभार्थी जॉबकार्डधारक असणे आवश्यक असल्याने त्यांना स्वत:च्या क्षेत्रात केलेल्या वृक्ष लागवडीचे संवर्धन व जोपासना करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. वृक्षनिहाय मापदंडानुसार दुसºया व तिसºया वर्षातील जिवंत झाडांच्या टक्केवारीप्रमाणे कामे  करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहणार आहे. या कार्यक्रमासाठी उपविभागाचे अधिकारी प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार व प्रकल्प निरीक्षण समिती नेमण्यात येणार असून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना