शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी ७५ हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचे नियोजन; शासकीय योजनांची जत्रा उपक्रम

By संतोष वानखडे | Updated: April 12, 2023 13:32 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्वतयारीचा आढावा

वाशिम- एप्रिल किंवा मे महिन्यात जिल्हयात आयोजित करण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची जत्रा उपक्रमातून जिल्हयात ७५ हजार लाभार्थ्यांना एकाच दिवशी योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले असून, त्याअनुषंगाने पूर्वतयारीचा आढावाही घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पार पडलेल्या सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी मिन्नु पी.एम., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शण्मुगराजन म्हणाले, लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी यंत्रणांनी तत्पर असायला हवे. संबंधित लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यायासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, त्याची पुर्तता लाभार्थ्यांकडून करुन घ्यावी. कोणत्याही गरजू लाभार्थ्याचा अर्ज नामंजूर केला जाणार नाही, याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

लाभार्थींपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा उपक्रम राबविला जाणार असून, जिल्हयातील शेवटच्या गरजू लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे.  प्रत्येक यंत्रणेचा या जत्रेमध्ये सहभाग राहणार आहे. यंत्रणेने या जत्रेच्या दृष्टीने काम करीत असलेल्या कामांचा अहवाल जिल्हा जनकल्याण कक्षाला दररोज सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या. यावेळी शैलेश हिंगे यांनी शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमाची माहिती दिली.

टॅग्स :washimवाशिम