शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पीके बहरली; तलावांची पाणीपातळी ‘जैसे थे’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 20:04 IST

वाशिम : खरिप हंगामातील पिकांना पोषक असा पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची पिके बहरली आहेत. असे असले तरी गेल्या १० दिवसांपासून मोठा तथा संततधार पाऊस अद्याप झाला नसल्याने सर्वच तलावांची पाणीपातळी वाढण्याऐवजी खालावत चालली आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास अल्पावधीतच भीषण पाणीटंचाई जाणवण्यासोबतच आगामी रब्बी हंगामही धोक्यात सापडण्याची शक्यता शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. 

ठळक मुद्दे१0 दिवसांपासून पावसाची उघडीपसंततधार पाऊस नसल्याने तलावांची पातळी खालावलीस्थिती अशीच कायम राहिल्यास भीषण पाणीटंचाई जाणवणार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरिप हंगामातील पिकांना पोषक असा पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची पिके बहरली आहेत. असे असले तरी गेल्या १० दिवसांपासून मोठा तथा संततधार पाऊस अद्याप झाला नसल्याने सर्वच तलावांची पाणीपातळी वाढण्याऐवजी खालावत चालली आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास अल्पावधीतच भीषण पाणीटंचाई जाणवण्यासोबतच आगामी रब्बी हंगामही धोक्यात सापडण्याची शक्यता शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पाऊस कोसळल्याची नोंद शासनदप्तरी झाली आहे. मात्र, हा पाऊस सलग झाला नसल्याने सिंचन प्रकल्पांच्या पाणीपातळीत २ ते ३ टक्क्यांनीही वाढ झाली नसल्याचे जलसंपदा विभागाकडून दर आठवड्यात जाहीर केल्या जाणाºया ‘वॉटल लेव्हल’च्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. अधूनमधून कोसळणाºया पावसामुळे अडचणीत सापडलेल्या खरिपातील पिकांना दिलासा मिळाला असला तरी जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढली नसल्याने भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.