शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा बॅरेजसचे पाणी वाशिमसाठी ; शेतकरी विरोधामुळे पोलीस बंदोबस्तात काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 17:08 IST

वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या  पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता न देण्यासाठी कोकलगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे प्रशासनाने ९ मार्च रोजी तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये पाईपलाइन अंथरण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. 

ठळक मुद्देबॅरेजेस परिसरातील नागरिकांशी चर्चा न करता वाशिम शहराला बॅरेजेसमधून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. पोलीसांच्या बंदोबस्तामध्ये पाइपलाइनच्या कामाला शक्रवारला प्रारंभ झाला.

वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या  पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता न देण्यासाठी कोकलगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे प्रशासनाने ९ मार्च रोजी तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये पाईपलाइन अंथरण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. 

जिल्हयातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कुठल्याच बॅरेजेसमधून वाशिम शहराला पाणी सोडू नये, या मागणीसाठी बॅरेजेस परिसरात वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांनी वाघोली फाट्यावर बेमुदत उपोषण केले हाते. दरम्यान, २१ फेब्रुवारीला उपोषणकर्त्यांसह इतर हजारो नागरिकांनी  जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता.  शेतीला सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळावे आणि शेतकऱ्यांना बारमाही पिके घेता येणे शक्य व्हावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले आहेत. असे असताना बॅरेजेस परिसरातील नागरिकांशी चर्चा न करता वाशिम शहराला बॅरेजेसमधून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. असा आरोप कोकलगाव परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यां कडे केला होता. बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पुरविणे अन्यायकारक असून वाशिमला न देण्यासाठी तिव्र विरोध वाढला होता. 

या विरोधामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी  नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी वाशिम शहर तातडीची पाणी पुरवठा योजना अंतर्गत पैनगंगा नदीवरील कोकलगाव बॅरेज ते एकबुर्जी धरणापर्यंत पाइपलाइन टाकण्याकरीता पोलीस अधिक्षकांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. यासाठी पोलीस अधिक्षकांनी ५ पोलीस अधिकारी, ४५ पोलीस कर्मचारी , १३ महिला कर्मचारी व एक आरसीपी प्लाटूनच असा तगडा बंदोबस्त कामाच्या ठिकाणी तैनात केला आहे. पोलीसांच्या बंदोबस्तामध्ये पाइपलाइनच्या कामाला शक्रवारला प्रारंभ झाला असून कोणत्याही प्रकारचा त्याठिकाणी अनुचीत प्रकार घडला  नसल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.    

टॅग्स :washimवाशिम