शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावाने खरेदीची सक्ती, व्यापाऱ्यांत रोषाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 16:26 IST

वाशिम: किमान आधारभूत किमतीपेक्षा अर्थात हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना १ वर्ष कैद व ५० हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: किमान आधारभूत किमतीपेक्षा अर्थात हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना १ वर्ष कैद व ५० हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाबाबत व्यापारी वर्गात रोषाचे वातावरण असून, राष्ट्रीयस्तरावरील बाजारभावच कमी असताना हमीभावाने खरेदी करावी कशी, असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. या कारणामुळे गत तीन दिवसांपासून वाशिम आणि रिसोड येथील बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांची खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. याचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे.राज्यात आधारभूत किमतीच्या खाली शेतीमाल खरेदी यापुढे गुन्हा ठरणार असून, शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणाºया व्यापाºयास एक वर्षार्ची कैद आणि ५० हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या कारवाईचे अधिकार राज्य शासनाने स्वत:कडे घेऊन कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कुरघोडी केली आहे. केंद्र सरकार नाफेडमार्फत हमीभावावर शेतीमालाचा ठराविक कोटा खरेदी केला जातो. उर्वरित मुबलक शेतीमाल शेतकºयांना अत्यल्प दरात व्यापाºयांना विक्री करावा लागतो. गेल्या दोन वर्षांत तूर, हरभरा, सोयाबीन, कापूस या पिकांना हमीभावाच्या अर्ध्याइतकाही दर शेतकºयांना मिळालेला नाही. यासंदर्भात सर्वच स्तरातून सरकार लक्ष्य होत असल्याच्या पृष्ठभूमीवर हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाºयांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारकडून वारंवार दिला जात होता. कायद्यातील पूर्वीच्या तरतुदीनुसार दोषी व्यापाºयांवर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई करता येत नव्हती. हा विचार करून पणन कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार आधारभूत किमतीच्या खाली शेतीमाल खरेदी राज्यात यापुढे गुन्हा ठरणार असून, शेतकºयांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या व्यापाºयांस एक वर्षाची कैद आणि ५० हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत व्यापारी वर्गात रोषाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्यातील वाशिम आणि रिसोड येथील बाजार समित्यांमध्ये गत तीन दिवस व्यापाºयांनी खरेदीच केली नाही. याचा फटका बाजारात शेतमाल घेऊन येणाºया शेतकºयांना झाला आहे. 

 

व्यापाºयांना आधारभूत किमतीची मर्यादा घालण्याचा निर्णय जाहिर करण्यापूर्वी शासनाने, राज्यात उत्पादित होणारा सर्व माल खरेदी करण्याची तयारी ठेवली पाहिजे व वर्षभर सर्व मालाच्या खरेदीसाठी केंद्र सुरु ठेवले पाहिजेत. सर्व माल खरेदी नाही केली तर याला जवाबदार कोण,  कोणाला तुरुंगात टाकणार, व्यापाºयांचे व्यवहार हे राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरील बाजारभावानुसार ठरतात. बाजारात अपेक्षीत भावच मिळत नसतील, तर हमीभावाने खरेदी कशी करणार- सुरेश भोयरअध्यक्ष व्यापारी, अडते संघटना वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम