शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपाच्या आराखड्यास स्थानिक स्तरावरच मिळणार परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 15:02 IST

सदर प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी न पाठविता बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंताच परवानगी देणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या कडेला पेट्रोल पंपाच्या आराखड्यास व पेट्रोलपंप, पेट्रोलपंपास सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्ट, हॉटेल, धाबे आदींना राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आदी मार्गावरून पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्याच्या नियमावलीत सार्वजनिक बांधकाम विभागाने १३ डिसेंबर रोजी बदल केले आहेत. आता सदर प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी न पाठविता बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंताच परवानगी देणार आहेत.रस्त्याच्या कडेला पेट्रोल पंपाच्या आराखड्यास व पेट्रोलपंप, पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्ट, हॉटेल, धाबे आदींना महामार्गावरून पोचमार्ग बांधण्यासाठी शासनाच्या परवानगीची आवश्यकता असते. परवानगीसाठी प्राप्त झालेले प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी तपासून शिफारशीसह राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविणे बंधकारक होते. या प्रक्रियेत अधिक गतिशिलता, पारदर्शकता व अधिक सुलभता आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १३ डिसेंबर रोजी शासन आदेश पारीत करीत बदल केले आहेत. या नवीन बदलानुसार क्षेत्रीय स्तरावर संबंधित सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांना पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. पोचमार्गाच्या परवानगी प्रक्रियेमध्ये अर्जदाराला सर्वप्रथम स्वारस्य अर्ज जिल्हानिहाय सार्वजनिक बांधकाम मंडळाकडे सादर करावा लागणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित अधीक्षक अभियंता प्रस्तुत अर्ज संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडे पाठवतील. अर्जदारासोबत प्रत्यक्ष जागेची व वाहतूक व्यवस्थेची पाहणी करून कार्यकारी अभियंत्यांना त्याबाबतचा अहवाल विहित नियमानुसार तयार करावा लागणार आहे. रस्त्याचा प्रकार लक्षात घेऊन आकारावयाचे भूभाडे, बँक गॅरंटी याबाबतच्या शुल्काची आकारणी कार्यकारी अभियंता स्तरावरून संबंधित अर्जदारांना कळविण्यात येणार आहे. शुल्काचा भरणा झाल्यानंतर आणि सदर प्रकरण कार्यकारी अभियंत्यांमार्फत प्राप्त झाल्यानंतर सक्षम प्राधिकारी तथा अधीक्षक अभियंता हे या प्रकरणास मान्यता प्रदान करतील, असा बदल नवीन नियमात करण्यात आला आहे.

 

टॅग्स :washimवाशिमPetrol Pumpपेट्रोल पंप