शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातून बरे होणाऱ्यांचा टक्का वाढला; पण मृत्यूसत्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 11:50 IST

Corona cases in Washim : दुसरीकडे मृत्यूसत्रही कायम असल्याने धोका अजून टळलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत सात दिवसांपासून नवीन रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्यांचा टक्का वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे; दुसरीकडे मृत्यूसत्रही कायम असल्याने धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता यापुढेही कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले.देशात साधारणत: मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्येत वाढ होत सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक होत २६०० रुग्णांची भर पडली होती. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख कमी होत गेला. जानेवारी महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आले. कोरोनाचा प्रवास परतीच्या मार्गावर असतानाच, फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक झपाट्याने वाढ झाली. दुसऱ्या लाटेत जनजीवन विस्कळीत होत आहे. वेळीच निदान व उपचार मिळावे याकरिता कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर देण्यात आला. रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १४ एप्रिलपासून राज्य शासनाने संचारबंदी लागू केली तर जिल्हा प्रशासनाने ९ मे पासून निर्बंध आणखी कठोर केले. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे चांगले परिणाम समोर येत असून, अलीकडच्या काळात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचा टक्का वाढला आहे. १७ मे ते २३ मे या दरम्यान नव्याने २४९४ रुग्ण आढळून आले तर ३५७१ जणांनी कोरोनावर मात केली. ही बाब जिल्हावासीयांसाठी तूर्तास तरी दिलासादायक ठरत आहे. दुसरीकडे मृत्यूसत्र कायम असल्याने धाकधूकही वाढत आहे. गत सात दिवसात ४९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णसंख्येचा आलेख किंचितसा खाली येत असला तरी धोका अजून टळलेला नाही. बेजबाबदार वर्तणूक पुन्हा अंगलट येऊ शकते. त्यामुळे कुणीही गाफील न राहता कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

सात दिवसात ४९ मृत्यूएकीकडे नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत आहे, कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे मृत्यूसत्र कायम असल्याने चिंताही वाढली आहे. १७ मे ते २३ मे या सात दिवसात ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसाला सरासरी सात मृत्यू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. १७ मे रोजी ३, १८ मे रोजी १, १९ मे रोजी २, २० मे रोजी ७, २१ मे रोजी ९, २२ मे रोजी १४, २३ मे रोजी १३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या