शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनासमोर पीककर्ज पुनर्गठनाची कसरत!

By admin | Updated: July 10, 2015 01:23 IST

सहा दिवस शिल्लक; वाशिम जिल्हा प्रशासनाची धावपळ.

वाशिम : पीककर्ज पुनर्गठनाची मुदत संपण्यास अवघे सहा दिवस शिल्लक असताना, अद्यापही ३0 टक्के पीककर्जाचे पुनर्गठण होणे बाकी आहे. सहा दिवसात पीककर्ज पुनर्गठनाचा आकडा पूर्ण करण्याची कसरत जिल्हा प्रशासनाला करावी लागणार आहे. दुसरीकडे पीककर्ज रुपांतरण समाधानकारक होत आहे. २0१४-१५ या आर्थिक वर्षातील पीककर्जाचे पुनर्गठण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत; मात्र या निर्देशांची अंमलबजावणी योग्य प्रकारे वाशिम जिल्ह्यात होत नसल्याची परिस्थिती आहे. २0१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ९९ हजार १९४ शेतकरी सभासदांनी एकूण ६६३ कोटी ९८ लाख रुपयांच्या पीककर्जाचा लाभ घेतला होता. या शेतकर्‍यांना पीककर्ज पुनर्गठनाचा लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश शासनाचे आहेत. पुनर्गठनास नकार देणार्‍या बँक प्रशासनाविरूद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलेले आहेत. १५ जुलैपर्यंंत पुनर्गठन केले जाणार आहे. ६ जुलैपर्यंंत विविध राष्ट्रीयीकृत बँकांनी २९ हजार १२६ शेतकरी लाभार्थींना १७६.३८ कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. बँक ऑफ बडोदाने १५८ शेतकर्‍यांचे १८.६ लाख, बँक ऑफ महाराष्ट्राने १९५ शेतकर्‍यांचे १८.७ लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ७४९ शेतकर्‍यांचे ५५.९ लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाने २११२ शेतकर्‍यांचे १.८६ कोटी, युनियन बँक ऑफ इंडियाने ३८६ शेतकर्‍यांचे २९ लाख, एसडीएफसी बँकेने २१२ शेतकर्‍यांचे ३७.४ लाख, डीसीसी बँकेने २0 हजार ३६८ शेतकर्‍यांचे १0९ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे पुनर्गठण, अशी आकडेवारी आहे. दरम्यान कर्ज रुपांतरणाचा आकडा १६९ कोटींवर गेला आहे. १७ हजार ७0४ शेतकर्‍यांनी कर्ज रुपांतरणाचा लाभ घेतला आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी, विदर्भ-कोकण ग्रामीण बँकांमध्ये सन २0१४-१५ च्या पीक कर्ज पुनर्गठनाची प्रक्रिया १५ जुलै २0१५ पर्यंत सुरु राहणार आहे. तसेच सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकर्‍यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या रुपांतरणबाबत रिझर्व्ह बँक व नाबार्ड कडून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी दिली.