शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापाठोपाठ न्यूमोनिया, विषमज्वराचे रुग्णही वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 12:00 IST

खबरदारी म्हणून न्यूमोनियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करावी, असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ न्यूमोनिया, विषमज्वराचे रुग्णही वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. दरम्यान, न्यूमोनियाग्रस्त जवळपास १५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने, खबरदारीचा प्रयत्न म्हणून न्यूमोनियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करावी, असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे.दरवर्षी साधारणत: पावसाळ्यात साथरोग उद्भवतात. यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य विभागासह जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, विषमज्वर आदी साथरोग उद्भवतात. जिल्ह्यात गत १५ दिवसांपासून हिवताप, डेंग्यू याबरोबरच न्यूमोनिया, विषमज्वराचे रुग्ण आढळून येत आहेत. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही विषमज्वर, न्यूमोनियाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. न्युमोनियाच्या रुग्णांपैकी काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत असल्याने न्यूमोनियाच्या रुग्णांची कोरोना चाचणी व्हावी, असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे. दुसरीकडे न्यूमोनिया रुग्णांची शक्यतोवर कोरोना चाचणी केली जाते, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास सोनटक्के यांनी स्पष्ट केले.दिवसातून ओपीडीच्या साधारणत: ५० ते ६० रुग्णांपैकी न्यूमोनियाचे पाच ते सात रुग्ण आढळून येत असून, यामध्ये ४५ वर्षावरील इसमांचा जास्त भरणा असल्याचे डॉ. सचिन पवार यांनी सांगितले.

मागील १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यात न्युमोनिया, सारीचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येते. सरकारी रुग्णालयांत या रुग्णांवर उपचार केले जातात. न्यूमोनिया, सारीच्या रुग्णांची कोरोनाची चाचणीही केली जात आहे. मागील १५ दिवसांत न्यूमोनिया असलेल्या जवळपास १५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. खासगी दवाखान्यात न्यूमोनियाचे रुग्ण असतील आणि त्यांनी कोरोना चाचणीसाठी संदर्भित केले तर निश्चितच या रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येतील.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम