शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑक्सिजन बेड’साठी रुग्ण वेटींगवर; जिल्ह्यात प्लांटही नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 13:08 IST

अकोला येथील प्लँटच्या भरवशावर राहण्याची वेळ जिल्हा आरोग्य यंत्रणेवर ओढवली आहे.

- संतोष वानखडे। लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा एकही बेड उपलब्ध नाही तसेच सरकारी दवाखान्यातही तुटवडा जाणवत आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही, जिल्ह्यात अद्याप आॅक्सिजन प्लँट नाही. आॅक्सिजनसंदर्भात अकोला येथील प्लँटच्या भरवशावर राहण्याची वेळ जिल्हा आरोग्य यंत्रणेवर ओढवली आहे.जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३४०० वर पोहचली आहे. सध्या जिल्ह्यात ८२५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून, कोरोनामुळे आतापर्यंत ५७ जणांचा बळी गेला आहे. अतिजोखीम गटातील रुग्णांना आॅक्सिजन सिलिंडरची गरज असून, जिल्ह्यात आॅक्सिजन प्लँट नाही. अकोला येथेही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आॅक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे अकोला येथील प्लँटमधून जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात आॅक्सिजनचा पुरवठाही पूर्वीप्रमाणे होत नसल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये आॅक्सिजनचा एकही बेड उपलब्ध नसून, या बेडसाठी रुग्ण वेटींगवर असल्याचे दिसून येते. जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथेही पूर्वीच्या तुलनेत आॅक्सिजनचा वापर पाचपटीने वाढला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दिवसाला २२ ते २५ सिलिंडर लागत आहेत. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात आॅक्सिजन प्लँट उभारणे आवश्यक ठरत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. अडीच लाख नागरिकांची आरोग्य तपासणीकोरोनाच्या पृष्ठभूमीवर खबरदारीचा प्रयत्न म्हणून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत अडीच लाखावर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितले. कोरोना व्यतिरिक्त अत्यावश्यक व गंभीर आजारी रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आॅक्सिजन सिलिंडर ठेवले जातात, असेही आहेर यांनी स्पष्ट केले.

  जिल्ह्यात आॅक्सिजन प्लँट नाही. सध्या अकोला येथून आॅक्सिजनचा पुरवठा होत आहे. जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळावा यासाठी १० हजार लिटरचा आॅक्सिजन प्लँट प्रस्तावित केला जाईल. यासंदर्भात पाठपुरावा करू.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या