शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 13:45 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या पृष्ठभूमीवर दिवाळीच्या उत्सवात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून संप मिटेपर्यंत खाजगी मालवाहू वाहने, खाजगी कपंल्यांच्या बसगाड्या, स्कूल बसेस, यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिसूचना गृहविभागाने १६ आॅक्टोबरच्या रात्रीच जारी केली आहे.

ठळक मुद्देगृहविभागाची अधिसूचना: एसटी कर्मचारी संप मिटेपर्यंत राहणार मूभा

वाशिम: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या पृष्ठभूमीवर दिवाळीच्या उत्सवात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून संप मिटेपर्यंत खाजगी मालवाहू वाहने, खाजगी कपंल्यांच्या बसगाड्या, स्कूल बसेस, यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिसूचना गृहविभागाने १६ आॅक्टोबरच्या रात्रीच जारी केली आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांसाठी १६ आॅक्टोबर २०१७ च्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे दिवाळीच्या उत्सवात एसटीच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. ही गैरसोय टळावी यासाठी प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उपाय योजना करणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या ५९ मधील कलम ६६ चे उपकलम (३) चा खंड (एन) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व खाजगी बसगाड्या, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे. एसटी कर्मचाºयांचा प्रस्तावित संप/ आंदोलन मिटेपर्यंत ही मूभा राहणार असून, या संदर्भात राज्याच्या गृहविभागाने महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने १६ आॅक्टोबर रोजीच अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे राज्यभरातील खाजगी वाहतूकदारांची दिवाळीच होणार असून, या निर्णयामुळे काही प्रमाणात तरी, प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. कोट: राज्यातील एसटी कर्मचाºयांचा संप लक्षात घेत गृहविभागाने सर्व खाजगी बसगाड्या, स्कूल बसेस, मालवाहू वाहनांना संपमिटेपर्यंत प्रवासी वाहतूक करण्याची मूभा दिली आहे. या संदर्भातील अधिसूचना आमच्याकडे प्राप्त झाली असून, त्याबाबत आमच्या स्तरावर सर्वांना सूचनाही दिल्या आहेत.-अर्चना गायकवाडउपप्रादेशिक परिवहन अधिकारीवाशिम