शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

By admin | Updated: August 5, 2016 00:02 IST

मंगरुळपीर तालुक्यातील घटना; घातपाताची शक्यता.

मंगरुळपीर, (जि. वाशिम) दि. ४ - तालुक्यातील पिंप्री ते निंबी रस्त्यावर पिंप्री अवगण शिवारात गुरूवारी सकाळच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळला. या घटनेची माहीती पिंप्री अवगणचे प्रभारी पोलीस पाटील विजय राठोड यांनी सकाळी ११ वाजताचे सुमारास जऊळका पोलीसांना दिली. त्यानंतर मंगरूळपीर व जऊळका ठाणेदार घटनास्थळावर दाखल झाले. मग दोन्ही ठाणोदारांमध्ये हद्दीचा वाद दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहिला. त्यानंतर पिंप्री अवगण व निंबीचे तलाठी घुगे यांना घटनास्थळावर पाचरण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळ पिंप्री अवगण शिवारात असल्याचे सांगितल्यावर सुध्दा दोन्ही ठाणेदारांचे समाधान झाले नाही. अखेर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी नवले यांनी घटनास्थळाला भेट दिल्यावर हा वाद संपुष्टात आला. सायंकाळी ५.३५ वाजता मंगरूळपीर येथील वैद्यकीय अधिकार्‍यांना पाचरण केले. सदर घटनास्थळ जऊळका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाल्यावर कार्यवाहीस प्रारंभ झाला. सदर मृतदेह अकोला येथील फॉरेन्सीक लॅबवर पाठविण्यात आला. हा मृतदेह नेमका कुणाचा? यातील आरोपी कोण? याबाबत तर्कविर्तक सुरू आहेत.