शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

पालकांनो, कागदपत्रे तयार ठेवा; १२ एप्रिलपासून मिळणार RTE प्रवेशाचे मेसेज

By दिनेश पठाडे | Updated: April 7, 2023 16:39 IST

७८७ जागांवर होणार प्रवेश; निवड यादीकडे  लक्ष

वाशिम - आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यासाठी बुधवारी राज्यस्तरावर सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुषंगाने निवड यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रवेशासाठी निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजतापासून मेसेज पाठविले जाणार आहेत.

शिक्षण हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा आर्थिक दुर्बंल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातील ९९ शाळांनी आरटीईतंर्गत नोंदणी केली. या शाळांमध्ये रिक्त ७८६ जागांवर पात्र बालकांना प्रवेश देण्यासाठी २५ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. विहित मुदतीत २७७२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील  निवडीसाठी पात्र ठरलेल्या अर्जाची सोडत जाहीर करण्यात आली. त्यात पालकांचा समावेश झाला की, नाही याची प्रतीक्षा पालकांना कायम आहे.  निवड प्रक्रियेचे काम सुरु असल्याने आरटीईचे पोर्टल सद्यस्थितीत बंद  असल्याचे संकेतस्थळावर शुक्रवारी पहावयास मिळाले. लवकरच निवड यादी अंतिम झाल्यानंतर संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. ज्या पालकांच्या  पाल्यांना लॉटरी लागली आहे. अशा पालकांना लघू संदेश १२ एप्रिलपासून पाठवले जाणार आहेत. त्यानंतर संबंधित शाळेत प्रवेश घेता येणार आहे. ऐनवेळी धावपळ नको म्हणून पालकांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे.

ही कागदपत्रे आवश्यकमोफत प्रवेशासाठी अनेक महत्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रहिवासी पुरावा, जात संवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, ओळखीचा पुरावा, बालक अनाथ असल्यास  कागदपत्रे असे काही इतर कागदपत्र प्रवेशावेळी आवश्यक आहेत.

मेसेजवर अवलंबून राहू नयेआरटीईतंर्गत प्रवेशासाठी निवड झालेल्या पात्र बालकांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. पात्र ठरलेल्या बालकांच्या पाल्यांना प्रवेशाबाबत संदेश प्राप्त होणार आहेत. मात्र, बालकांनी केवळ संदेशावर अवलंबून न राहता संकेतस्थळावर भेट देऊन निवड यादीपाहून प्रवेशाची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा