शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील पूनर्वसित पांगरखेडा गाव सार्वजनिक पाणी पुरवठयापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 17:10 IST

 शिरपूर जैन :  : मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पामुळे पांगरखेडा गावाचे पुर्नवसन शिरपूरच्या ई क्लास जमिनीवर चार वर्षापुर्वी करण्यात आले. तेव्हापासून पुर्नवसित पांगरखेडयात अद्यापही सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यात आली नाही.

ठळक मुद्देचार वर्षापूर्वी करण्यात आले होते पूनर्वसन इतरही सुविधांचा अभाव

 शिरपूर जैन :  : मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पामुळे पांगरखेडा गावाचे पुर्नवसन शिरपूरच्या ई क्लास जमिनीवर चार वर्षापुर्वी करण्यात आले. तेव्हापासून पुर्नवसित पांगरखेडयात अद्यापही सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यात आली नाही. तसेच ईतरही सुविधांचा अभाव येथे दिसून येत आहे. 

मालेगाव तालुक्यात शिरपूरजैन जवळ एक ते दिड किलोमीटर अंतरावर मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्प निर्मितीचे काम सुरु आहे . पांगरखेडा गाव हे बुडीत क्षेत्रात येत असल्याने चर वर्षापुर्वी पांगरखेडचे पुर्नवसन शिरपूर ई क्लासच्या जमिनीवर करण्यात आले  होते, मात्र पुर्नवसन करण्या अगोदर पुर्नवसीत गरजेचे असतान देखील अद्यापही येथे अनेक सुविधा ,सोयी  निर्माण करण्यात प्रशासना चाल कल करीत आहे. त्यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी होय.  परिणामता  पांगरखेड वसीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते अथवा खाजगी बोअरवाल्याकडून पाणी आणावे लागले. एप्रिलमध्ये गावात असलेले बोअरचे पाणी आटत असल्याने उन्हाळयात तिव्र पाणी टंचाइर् निर्माण होते. या वर्षी तर पाउस कमी झाल्याने जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईची झळ पुर्नवसीत पांगरखेडा वासीयांना असल्याचे गावकरी बोलत आहेत . मात्र लघू पाट बंधारे विभाग गावकºयांच्या  सुविधेसाठी सार्वजनिक पाणी पुरवठयासाठी मंजूर असलेल्या विहीरीचे खोदकाम करण्यासाठी तत्पर नसल्याचे दिसून येत आहे . याच प्रमाणे नियोजित प्रवासी निवारा बाांधकामही अद्यापही सुरु करण्यात आले नाही. यासोबतच अनेक दिवसांपासून अर्ज करुनही विद्युत पुरवठा सुध्दा ग्रामस्थांना मिळाला नव्हता. तयार करण्यात आलेल्या रस्तयाची अतिशय दुरावस्था झाली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देवून पूनर्वसन झालेल्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.

पुर्नवसीत पांगरखेडावासीयांना पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजित मंजूर विहीर खोदकाम करण्यासाठी निविदा काढण्यात येणार असून येत्या तिन महिन्यात विहीर खोदकाम पुर्ण करण्यात येईल.-- श्री.मा. हाते,अभियंता लघू पाटबंधारे विभाग, वाशिम.

आमच्या पांगरखेडा गावाचे पुर्नवसन करुन चार वर्श लोटली तरी सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करुन देण्यात पाटबंधारे विभागाने टाळाटाळ केली त्यामुळे गावातील लोकांना सतत पाण्याची समस्या जाणवते. - भगवान गावंडे, खरेदी विक्री संस्था अध्यक्ष तथा रहीवाशी पांगरखेडा.