शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीमधून घरकुलांचे तक्रार अर्ज होताहेत गहाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 19:57 IST

मेडशी: मंजूर झालेल्या घरकुलांचा लाभ देण्याकरिता प्रशासनातील कर्मचारी पैशांची मागणी करतोय, अशी तक्रार मेडशी येथील गोरगरिब विधवा महिलांनी गत १५ दिवसांपूर्वी (३ आॅगस्ट) मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांकडे केली होती. मात्र, त्यावर अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही. याऊलट ‘आवक-जावक’मधून अशी कुठलीच तक्रार आपल्यापर्यंत पोहचली नसून तक्रार अर्ज परस्परच गहाळ होतात, असे वक्तव्य पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी केले.

ठळक मुद्देमंजूर झालेल्या घरकुलांचा लाभ देण्याकरिता पैशांची मागणी गटविकास अधिका-यांकडे १५ दिवसांपूर्वी तक्रार आवक-जावक’मधून तक्रार गहाळ 

लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी: मंजूर झालेल्या घरकुलांचा लाभ देण्याकरिता प्रशासनातील कर्मचारी पैशांची मागणी करतोय, अशी तक्रार मेडशी येथील गोरगरिब विधवा महिलांनी गत १५ दिवसांपूर्वी (३ आॅगस्ट) मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांकडे केली होती. मात्र, त्यावर अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही. याऊलट ‘आवक-जावक’मधून अशी कुठलीच तक्रार आपल्यापर्यंत पोहचली नसून तक्रार अर्ज परस्परच गहाळ होतात, असे वक्तव्य पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी केले.ग्रामीण भागातील गोरगरिब कुटूंबात वास्तव्य करणाºया बेघर लाभार्थींना शासनाकडून घरकुलांचा लाभ दिला जातो. त्यानुसार, मेडशी येथील अनेकांना घरकुल मंजूर झाले. मात्र, त्यासाठी लागणारी जागा स्थानिक ग्रामपंचायतीने अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. याशिवाय मंजूर झालेल्या घरकुलांचे अनुदान पाहिजेत असल्यास पैसे मोजावे लागतील, असा दम प्रशासनातीलच एका कर्मचाºयाने गोरगरिब लाभार्थींना भरला आहे. त्यामुळे संतापलेल्या काही विधवा महिलांनी १५ दिवसांपूर्वी मालेगावच्या पंचायत समितीवर धडक देवून याबाबतची लेखी तक्रार सादर केली. एवढेच नव्हे तर तक्रारीत पैशांची मागणी करणाºया संबंधित कर्मचाºयाचे नावही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी किमान कार्यवाही होईल, अशी लाभार्थ्यांची अपेक्षा होती. मात्र, १५ दिवस उलटूनही कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे तक्रारदार विधवा महिलांचा हिरमोड झाला आहे.