समृद्धी महामार्ग हा विकासाचा महामार्ग ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नागपूर ते मुंबई या दरम्यान कमी वेळात या महामार्गावरून प्रवास करता येणार असल्याने ते सर्वांच्याच फायद्याचे ठरणारे आहे. दुसरीकडे, या महामार्गामुळे इतर गावांना जोडणारे रस्ते, पाणंद रस्ते काही प्रमाणात अडचणीत येत असल्याचे शेंदुरजना मोरे परिसरात दिसून येत आहे. कुठे उड्डाणपुलाद्वारे, तर कुठे समृद्धी महामार्गाच्या खालून भूमिगत रस्ता करून देत आहेत. मात्र समृद्धीच्या कामामुळे पाणंद रस्त्याचा संपर्क तुटत आहे. त्यांना पुन्हा जोडून देण्याबाबत प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. पाणंद रस्ते हे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. शेंदुरजना मोरे येथून मजलापूर तलावावर जाणारा पाणंद रस्ता समृद्धीमुळे तुटला आहे. त्याला पुन्हा जोडण्याबाबत कुठल्याच प्रकारची व्यवस्था केल्याचे दिसून येत नाही.
महामार्गामुळे पाणंद रस्त्याचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:37 IST