शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

खोट्या गुन्ह्यात अडकविल्याबद्दल नुकसानभरपाई देण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 16:07 IST

फिर्यादी व साक्षीदाराने आपणास ८० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जातीवाचक शिविगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल करून खोट्या गुन्ह्यात अडकविल्याबद्दल फिर्यादीने आरोपीस ७५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश येथील दिवाणी न्यायालयाने दिला.यासंदर्भात अधिक माहिती अशी, की फिर्यादी भिवराबाई विठ्ठल गायकवाड हिने ५ जुलै २०११ रोजी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये महादेव सावके यांनी आपणास जातीवाचक शिविगाळ केली व मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली. त्यावरून महादेव सावके यांच्यावर कलम २९४, ३२४, ५०६ भादंवि व सहकलम ३ (१)(१०) अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली; मात्र याप्रकरणी महादेव सावके यांची जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ डिसेंबर २०१४ रोजी निर्दोष मुक्तता झाली.दरम्यान, सावके यांनी सदर गुन्हा हा खोटा असून सुडबुद्धीने दाखल करून आपणास नाहक त्रास देण्यात आला. त्यामुळे बरीच रक्कम खर्च झाली असून मानसिक, सामाजिक त्रासाला देखील सामोरे जावे लागले, असा तक्रार अर्ज दिवाणी न्यायालयात दाखल करून फिर्यादी व साक्षीदाराने आपणास ८० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली होती. सबळ पुरावे व साक्षीअंती सावके यांना खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचे सिद्ध झाले. त्यावरून दिवाणी न्यायालयाचे एस.पी. बुंदे यांनी याप्रकरणातील फिर्यादी व साक्षीदारांना संयुक्तपणे ७५ हजार रुपये महादेव सावके यांना दोन महिन्यात द्यावे, असे आदेश पारित केले. सावके यांच्यातर्फे अ‍ॅड डी.जी. ढोबळे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी