शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड संथगतीने  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 12:21 IST

Washim News आतापर्यंत केवळ ३७४ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०२०-२१ या वर्षात ४७५ गावांतील १७२० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत केवळ ३७४ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे.शेतीच्या उत्पादनात वाढ करणे, पारंपरिक पिकांबरोबरच फळबाग लागवडीखालील क्षेत्रफळात वाढ करणे, फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे आदी उद्देशातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड केली जाते. सन २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यात ४७५ गावांमधील १७२० हेक्टर क्षेत्रफळावर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट मिळाले आहे. आतापर्यंत १३३७ शेतकरी तसेच ११६६.१४ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी १०३९.१४ हेक्टर क्षेत्रावरील लागवड प्रस्तावाला तांत्रिक, तर ८३८.४९ हेक्टरवरील प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत यापैकी ४२० शेतकऱ्यांनी ३७४ हेक्टरवर फळबाग लागवड केली. वाशिम तालुक्यातील ५६ गावात ३०० हेक्टरचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ८५ शेतकरी तसेच ७५ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी केवळ तीन शेतकऱ्यांनी तीन हेक्टरवर फळबाग लागवड केली. रिसोड तालुक्यातील ७८ गावात २२० हेक्टरचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ३१० शेतकरी तसेच २५७ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी केवळ २८ शेतकऱ्यांनी २४.५० हेक्टरवर फळबाग लागवड केली. मानोरा तालुक्यातील ४१ गावांत २२० हेक्टरचा लक्ष्यांक आहे. आतापर्यंत १२८ शेतकरी तसेच १२३ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी ७८ शेतकऱ्यांनी ७२ हेक्टरवर फळबाग लागवड केली. कारंजा तालुक्यातील १६५ गावांत ३४० हेक्टरचा लक्ष्यांक आहे. आतापर्यंत १२८ शेतकरी तसेच १२१.१४ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी केवळ ३० शेतकऱ्यांनी ३० हेक्टरवर फळबाग लागवड केली.

मालेगाव, मंगरूळपीर तालुका आघाडीवरफळबाग लागवडीत मालेगाव व मंगरूळपीर तालुका आघाडीवर असल्याचे दिसून येते. मालेगाव तालुक्यातील ५२ गावात ३०० हेक्टरचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ३२० शेतकरी तसेच २६५.५ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. २६५.५ हेक्टर क्षेत्रावरील लागवड प्रस्तावाला तांत्रिक तर २४४.१९ हेक्टरवरील प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यापैकी १२२ शेतकºयांनी ११० हेक्टरवर फळबाग लागवड केली. मंगरूळपीर तालुक्यातील ८३ गावात ३४० हेक्टरचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ३६६ शेतकरी तसेच ३२४.५ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. ३२४.५ हेक्टर क्षेत्रावरील लागवड प्रस्तावाला तांत्रिक तर २६९.४ हेक्टरवरील प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यापैकी १५९ शेतकºयांनी १३४.५० हेक्टरवर फळबाग लागवड केली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना