शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान; ना मास्क, ना सॅनिटायझर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:38 IST

वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र राज्य एस.टी. परिवहन महामंडळाकडून धावणाऱ्या बस बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, लांब पल्ल्याच्या ...

वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र राज्य एस.टी. परिवहन महामंडळाकडून धावणाऱ्या बस बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, लांब पल्ल्याच्या खाजगी ट्रॅव्हल्सना नियम पाळण्याच्या अटीखाली प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. याअंतर्गत वाशिममार्गे, नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई आदी महानगरांकडे जाणाऱ्या व येणाऱ्या २० ट्रॅव्हल्स सुरू आहेत. त्यात प्रवास करणाऱ्या अनेकांकडून मात्र तोंडाला मास्क लावण्यासह सॅनिटायझरचा वापर केला जात नसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिकच तीव्र झाले आहे. दिवसेंदिवस बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यासह कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांचा आकडाही वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तोंडाला नियमित मास्क लावणे, हात साबण किंवा सॅनिटायझरने वारंवार धुऊन स्वच्छ करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासह इतरही नियमांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र, ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून नियम पाळण्याचे आवाहन केले जात असताना प्रवास करणाऱ्या बहुतांश लोकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.

....................

रोज शहरातून जाणाऱ्या व येणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या - २०

प्रवाशांची संख्या - ५००

.....................

(बॉक्स)

ना मास्क, ना सॅनिटायझर

सध्या वाशिममार्गे मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या महानगरांमध्ये ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. विदर्भ, चिंतामणीसह इतरही कंपन्यांच्या ट्रॅव्हल्स सुरू आहेत. दरम्यान, काही ट्रॅव्हल्समध्ये जाऊन पाहणी केली असता बहुतांश प्रवासी विनामास्क आढळून आले. गर्मीच्या त्रासापासून बचाव व्हावा म्हणून मास्क नाही लावला, असे काही जणांनी सांगितले, तर सॅनिटायझरचा वापरही होत नसल्याचे दिसून आले.

...............

(बॉक्स)

एकाही ट्रॅव्हल्सवर कारवाई नाही

पुणे, मुंबई, नाशिक यासह इतर महानगरांमध्ये वाशिममधून जाणाऱ्यांची संख्या सध्या नगण्य आहे. बाहेर जिल्ह्यातील प्रवाशांची संख्याही जेमतेम असते. बहुतांश ट्रॅव्हल्स रात्रीचा प्रवास करतात. प्रवाशांकडून नियम पाळले जात नसले तरी एकाही ट्रॅव्हल्सवर अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही, अशी माहिती मिळाली.

...............

(बॉक्स)

ई-पास नसणाऱ्यांची चाैकशीच नाही

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जवळ प्रशासनाकडून दिला जाणारा ई-पास बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. चारचाकी वाहने थांबवून पोलिसांकडून ठिकठिकाणी तपासणीही केली जात आहे. मात्र, ट्रॅव्हल्समधून विना ई-पास प्रवास करणाऱ्यांची चाैकशीही केली जात नसल्याचे दिसून येत आहे.