शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी वाशिम जिल्ह्यातील केवळ २ शेतकरी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 14:11 IST

वाशिम: गतवर्षी एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान राज्यात अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

ठळक मुद्दे शासनाने आर्थिक मदत म्हणून ११०,०९,००,७५० (एकशे दहा कोटी नऊ लक्ष सातशे पन्नास रुपये) इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील केवळ दोन शेतकºयांचा समावेश आहे.राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हे प्रमाणही सर्वात कमी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: गतवर्षी एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान राज्यात अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  या नुकसानीपोटी आर्थिक भरपाई म्हणून शासनाने २ लाख ७९ हजार ५२२ अतिवृष्टी बाधित शेतकºयांना मदत जाहीर केली. यात वाशिम जिल्ह्यातील केवळ २ शेतकºयांचा समावेश आहे. माहे एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होेते. या नुकसानीची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना क्षेत्रिय अधिकाºयांना देण्यात आल्या होत्या. या पंचनाम्यानंतर शासन निकषानुसार राज्यभरातील  २ लाख ७९ हजार ५२२ अतिवृष्टी बाधित शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत म्हणून ११०,०९,००,७५० (एकशे दहा कोटी नऊ लक्ष सातशे पन्नास रुपये) इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील केवळ दोन शेतकºयांचा समावेश आहे. शासनाच्या निकषानुसार जिल्ह्याती केवळ १.६० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे शासनाने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीसाठी अमरावती विभागातील १५०८ शेतकरी पात्र ठरले असून, राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हे प्रमाणही सर्वात कमी आहे. वाशिम शिवाय औरंगाबाद विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यातील दोनच शेतकरी पीक नुकसानीच्या मदतीस पात्र ठरले आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती