शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा विचारच देशाला वाचवू शकतो : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ. वजाहत मिर्झा, आ. कुणाल पाटील, ...

अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ. वजाहत मिर्झा, आ. कुणाल पाटील, माजी आ. नातिकोद्दीन खतीब, निरीक्षक अतुल लोंडे, जिल्हा निरीक्षक प्रकाश साबळे, जिल्हाध्यक्ष एड. दिलीप सरनाईक, मो. युसूफ पुंजानी, जिल्हा प्रवक्ता दिलीप भोजराज आदींची उपस्थिती होती. नाना पटोले म्हणाले की, कोरोना महासंक्रमणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केलेल्या कामाची शाबासकी देण्यासाठी तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन शासनाच्या माध्यमातून प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण दौरा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार सत्तेत आल्यापासून धान्याची भीक देत आहे. द्यायचेच असेल तर पैसे द्यावे. आम्ही काँग्रेस सत्तेचा दूरपर्यंत विचार करीत नाही. नुकतेच काँग्रेसच्यावतीने राज्यात पेट्रोल, डिझेल दरवाढीच्याविरोधात आंदोलन केले. केंद्र सरकार पेट्रोलच्या मूळ किमतीवर १८ रुपये प्रती लिटर रस्ते विकासाचा कर घेते. पेट्रोल १०० रुपयांच्या वर गेले असून, डिझेलही लवकरच शतक गाठणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाजपेयी सरकार ते डॉ. मनमोहनसिंग सरकारपर्यंत १ रुपया रस्ते विकासाचा कर घेतला जात होता. त्यावेळी १९ हजार कोटी रुपये केंद्राच्या तिजोरीत जमा होत होते, असे त्यांनी सांगितले. मोदी सरकारने खासगीकरण करण्याचा सपाटा लावला. शासकीय कंत्राटदारांकडून इस्टिमेट केले जात आहे. रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. ओबीसींचे नुकसान भाजपने केल्याने त्यांना ओबीसींच्या आरक्षणासाठी मोर्चे काढण्याचा काहीही अधिकार नसल्याचेही पटोले म्हणाले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष रमेश लांडकर, शहराध्यक्ष हमीद शेख यांनी पुढाकार घेतला. संचालन शमीम फरहत यांनी, तर आभार अ‍ॅड. फिरोज शेकूवाले यांनी मानले.