शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात केवळ ७६३ शेततळी पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 14:37 IST

वाशिम : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा चांगलाच आटापिटा सुरू आहे.

ठळक मुद्देमागेल त्याला शेततळे योजना अनुदानाच्या तुलनेत दुप्पट खर्च

वाशिम : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा चांगलाच आटापिटा सुरू आहे. शेततळ्यासाठी मिळणाºया अनुदानाच्या तुलनेत दुप्पट खर्च लागत असल्याने या योजनेला शेतकºयांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. दीड वर्षांत १९००  पैकी केवळ ७६३ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले.महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी, तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच उत्पादनावर विपरित परिणाम जाणवतो. शेती उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी प्रारंभी १८०० शेततळ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. नंतर त्यात वाढ करून १९०० शेततळ्यांचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते. तथापि, वाशिम जिल्ह्याचा भूस्तर समान नसून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवघ्या पाच फुट खोलवरच खडक लागतो. त्यामुळे शेतकºयांना निर्धारित अनुदानात शेततळ्यांचे खोदकाम करणे शक्य होत नाही. शासनाने शेततळ्यासाठी ५० हजार रुपये आर्थिक अनुदानाची मर्यादा घालून दिली असताना अनेक शेतकºयांना या रकमेपेक्षा दुपटीहून अधिक खर्च करून शेततळे तयार करावे लागले. या मुख्य कारणामुळेच अनेक शेतकरी योजनेचा फायदा घेण्यास उत्सूक नसल्याचे दिसून येते. याशिवाय शेतकºयांना योजनेतंर्गत खोदकामाच्या नंतर अनुदान प्राप्त होते. त्यामुळे अनेक शेतकºयांची इच्छा असताना आणि जमीन शेततळ्यासाठी योग्य असताना पैशाअभावी त्यांना याचा फायदा होत नसल्याचेही वास्तव आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७६३ शेततळी पूर्ण झाली आहेत. 

दरम्यान, या योजनेंतर्गतच्या अनुदानात किमान एक लाख रुपयाने वाढ केल्यास शेतकºयांसाठी ही बाब सोयीची ठरणारी राहिल. शासनाने शेतकºयांची रास्त मागणी विचारात घेऊन या योजनेंतर्गतचे अनुदान किमान दीड लख रुपये करावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप देशमुख यांनी शुक्रवारी केली.

टॅग्स :agricultureशेती