शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात केवळ ७0 एकरवर रेशीम शेती!

By admin | Updated: March 6, 2017 02:32 IST

‘मनरेगा’तून भरघोस अनुदान; मात्र बाजारपेठेअभावी शेतक-यांमध्ये उदासिनता.

वाशिम, दि. ५- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतून प्रति एकर १ लाख ९२ हजार रुपये अनुदान मिळत असतानाही जिल्हयात आजपर्यंत केवळ ७0 एकरापर्यंत रेशीम शेती उभी राहू शकली. तथापि, रेशीम कोष विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ नसणे, प्रक्रिया उद्योगांचा अभाव आणि शासनाच्या तकलादू हमीभावामुळेच रेशीम शेतीकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरवल्याचे एकंदर चित्र आहे. अत्यंत कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणून रेशीम उद्योगाला मान्यता मिळाली आहे; मात्र यासंबंधी प्रभावी जनजागृती नसल्यामुळे जिल्ह्यात हा उद्योग तग धरू शकला नाही. येथील रेशीम विकास अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार आजपर्यंत जिल्ह्यातील ४४ शेतकर्‍यांच्या केवळ ६३.५ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड असून हे शेतकरी रेशीम कोष उत्पादन घेतात. मात्र या कोषांच्या विक्रीसाठी अद्याप हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. तसेच शासनाकडून रेशीम कोषाला मिळणारा दर प्रतिकिलो केवळ १८0 रुपये आहे. रेशीम कोषावर प्रक्रिया करणारा एकही उद्योग महाराष्ट्रात अद्याप उभा राहू शकला नाही अथवा कोष विक्रीकरिता राज्यात कुठेच बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये या उद्योगाप्रती उदासिनतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतून १.९२ लाख रुपये अनुदानाची तरतूद!महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतून तुती लागवड करणार्‍या शेतकर्‍यास अकुशल मजूरीपोटी तीन वर्षांत १ लाख ३0 हजार ९४४ रुपये अनुदान दिले जाते. यासह पहिल्या वर्षी शेणखत, तुती रोपे, चंद्रीका-१00, प्लास्टिक ट्रे-१0, नायलॉन जाळी-४, गटूर स्प्रे पंप, औषधीसाठी ३२ हजार १६0 रुपये, दुसर्‍या वर्षी ब्रशकटर, जैविक खते, पोषण औषधी, निर्जंतुकीकरण पावडर आदिंसाठी १९ हजार २८५ आणि तिसर्‍या वर्षी जैविक खते व निर्जंतुकीकरण पावडरकरिता १0 हजार २८५, असे ६१ हजार ७३0 रुपये अनुदान दिले जाते. असे असताना रेशीम विकास अधिकारी कार्यालयाकडून योग्य जनजागृती नसल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून अद्याप अनभिज्ञ असल्याने रेशीम शेतीचे प्रमाण ह्यजैसे थेह्ण असल्याची स्थिती आहे.