शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ १६ टँकरला मंजुरी, ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 15:43 IST

जिल्ह्यातील शेकडो गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, काही गावांत यावर नियंत्रणासाठी केवळ टँकरने पाणी पुरवठा हाच अंतिम पर्याय आहे.

वाशिम: जिल्ह्यातील शेकडो गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, काही गावांत यावर नियंत्रणासाठी केवळ टँकरने पाणी पुरवठा हाच अंतिम पर्याय आहे. यासाठी ३० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी पंचायत समितीमार्फत उपविभागीय स्तरावर प्रस्तावही पाठविले; परंतु सद्यस्थितीत जिल्हास्तरावर केवळ २४ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातील १६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, तर पाच प्रस्ताव त्रुटीमुळे रखडले आहेत. वाशिम जिल्ह्याची भुजल पातळी सव्वा मीटरने खालावली असताना विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. तीन मध्यम प्रकल्पांत २५ टक्क्यांच्या जवळपास पाणीसाठा आहे, तर १०९ लघू प्रकल्पापैकी जेमतेम ६० प्रकल्पांत मृतसाठा उरला आहे. त्यामुळे रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि वाशिम या सहाही तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पाण्यासाठी ग्रामस्थ वणवण भटकत आहेत. त्यामुळे संंबंधित ग्रामपंचायतींनी पंचायत समितीमार्फत उपविभागीय अधिका-यांकडे विहिरी, कूपनलिका अधिग्रहणासह टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठविले आहेत. त्यात टँकरच्या प्रस्तावांची संख्या ३० पेक्षा अधिक आहे. तथापि, उपविभागीय अधिका-यांमार्फत जिल्हास्तरावर केवळ २४ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातील केवळ १६ प्रस्तावांनाच अंतिम मंजुरी मिळाली आहे, तर ८ पैकी ५ प्रस्ताव त्रुटीअभावी रखडले आहेत. पाणीटंचाई निवारणाबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.--------------------१० गावांत टँकरच्या २८ खेपा जिल्हास्तवरून मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष १० गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला असून, यात वाशिम तालुक्यातील बाभुळगाव येथे ५ हजार लीटर टँकरच्या १० खेपा, रिसोड तालुक्यातील करंजी येथे ५ हजार लीटरच्या ५ खेपा, मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे येथे २४ हजार लीटरच्या ४ खेपा, धानोरा येथे २४ हजार लीटरच्या दोन खेपा, मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे २४ हजार लीटरच्या दोन खेपा,मानोरा तालुक्यातील उज्ज्वल नगर येथे २४ हजार लीटरच्या दोन आणि गलमगाव येथे १२ हजार लीटरची एक, कारंजा तालुक्यात्ील दादगाव आणि धोत्रा देशमुख येथे २४ हजार लीटरची प्रत्येकी एक, तर गिर्डा येथे २४ हजार लीटरच्या दोन खेपा, अशा प्रमाणात ग्रामस्थांना पाणी पुरवठा करून तहान भागविण्याचा प्रयत्न होत आहे.