शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ११ टक्के नागरिकांनी घेतला लसीचा दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 11:58 IST

Corona Vaccine : ९ हजार ६१२ नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही. 

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यातील १०.१३ लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत ३.५३ लाख नागरिकांना पहिला डोस, तर १.१८ लाख नागरिकांना (११.६८ टक्के) लसीचा दुसरा डोस मिळाला. पहिल्या डोसनंतर विहित कालावधी पूर्ण होत असलेल्या जवळपास ९ हजार ६१२ नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. एप्रिल, २०२० ते जानेवारी, २०२१ या कालावधीत एकूण कोरोनाबाधित ७,१४३ होते. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे, २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारांवर रुग्ण आढळून आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात आला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याला सुरुवात झाली. दुसरी लाट ओसरत नाही; तेच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. ९ ऑगस्टपर्यंत तीन लाख ५३ हजार ३९२ नागरिकांना पहिला डोस तर एक लाख १८ हजार ३४१ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. पहिल्या डोसनंतर विहित कालावधी पूर्ण झालेल्या जवळपास १५ हजार नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही. दुसरा डोस घेण्याबाबत अनेक नागरिक अजूनही उदासीन असल्याचे दिसून येते

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. नागरिकांनीही स्वत:बरोबरच कुटुंबाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लस घ्यावी. लस ही पूर्णत: सुरक्षित व प्रभावी असून, कोणत्याही अफवा, गैरसमजावर विश्वास ठेवू नये. - डॉ. अविनाश आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमCorona vaccineकोरोनाची लस